ISL 2021 : एक्स्ट्रा टाईममध्ये एटीके मोहन बागानचा थरारक विजय; बदली खेळाडूने सामना पलटला

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

सामन्यातील अखेरच्या क्षणात एटीके मोहन बागानच्या टिरी याने चेन्नईयीनच्या एनेस सिपोविच याचा हेडर गोललाईनवरून अयशस्वी  ठरवत संघाची आघाडी टिकवून ठेवली. या सामन्यात  एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. त्याने स्पर्धेत आठ सामन्यात एकही गोल होऊ दिलेला नाही. 

ISL 2021 Football News :  सामन्याच्या निर्धारित वेळेत बरोबरीत सुटलेल्या सामन्याला बदली खेळाडूनं कलाटणी दिल्याचे चित्र एटीके मोहन बागान आणि  चेन्नईयीन यांच्यातील सामन्यात पाहायला मिळाली. एक्स्ट्रा टाईममध्ये पहिल्याच मिनिटाला बदली खेळाडू डेव्हिड विल्यम्स याने डागलेल्या गोलमुळे  इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एटीके मोहन बागानने चेन्नईयीन एफसीवर 1-0 असा विजय नोंदवला. स्पर्धेतील त्यांचा हा सातवा विजय आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातील 67 व्या मिनिटाला विल्यम्सन मैदानात उतरला होता. सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेल्यावर त्याने मिळालेल्या संधीच सोन करत संघाला विजयी गोल डागला.  90+1व्या मिनिटास सेटपिसेसवर केलेला गोलमुळे कोलकात्याच्या संघाला तीन गुण मिळाले.  जेवियर हर्नांडेझच्या कॉर्नर किकवर ऑस्ट्रेलियन विल्यम्सने भेदक हेडिंग साधत चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथला चकवा दिला. 

ICC Test Ranking : पंतची गरुड झेप; विराटवर पाच वर्षात पहिल्यांदाच ओढावली नामुष्की

सामन्यातील अखेरच्या क्षणात एटीके मोहन बागानच्या टिरी याने चेन्नईयीनच्या एनेस सिपोविच याचा हेडर गोललाईनवरून अयशस्वी  ठरवत संघाची आघाडी टिकवून ठेवली. या सामन्यात  एटीके मोहन बागानचा गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्ज याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. त्याने स्पर्धेत आठ सामन्यात एकही गोल होऊ दिलेला नाही. 

अंतोनियो हबास यांच्या मार्गदर्शनाखालील एटीके मोहन बागानच्या खात्यात 12 लढतीनंतर  24 गुण जमा झाले आहेत. पहिल्या क्रमांकावरील मुंबई सिटीपेक्षा त्यांचे केवळ 2 गुण कमी आहेत. दुसरीकडे चेन्नईयीनला स्पर्धेतील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले असून साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या खात्यात 13 लढतीनंतर 15 गुण जमा झाले असून क्रमवारीत हा संघ सहाव्या स्थानावर आहे.  

रोनाल्डोनं गाठलं विक्रमाचं नवं शिखर; शर्यतीत मेस्सी खूप मागे पडलाय

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध पवित्रा करत बचावात्मक खेळ करण्यास पसंती दिली.  पूर्वार्धात बचावात्मक ठरला. त्यामुळे सामना रंगतदार ठरू शकला नाही. त्यातच मिळालेल्या संधीही साधता आल्या नाही. सामन्याच्या नवव्या मिनिटास चेन्नईयीनच्या रहीम अलीच्या फटक्याचा नेम चुकला. त्यानंतर 21 व्या मिनिटास चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने डाव्या बाजूने झेपावत एटीके मोहन बागानच्या जेवियर हर्नांडेझ याचा प्रयत्न उधळून लावला होता.सामन्यातील 73व्या मिनिटास एटीके मोहन बागानला चांगली संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी गोल डागण्यात यश मिळवले असते तर सामना एक्स्ट्रा टाईमध्य गेलाच नसता.   


​ ​

संबंधित बातम्या