ISL2021 : अखेर नॉर्थईस्ट युनायटेडचा विजय; देशॉर्न ब्राऊनचे संस्मरणीय पदार्पण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

तासाभराच्या खेळानंतर जमैकाचा तीस वर्षीय आघाडीपटू देशॉर्न ब्राऊन याने नॉर्थईस्टसाठी पदार्पण संस्मरणीय ठरविले. अगोदर बंगळूर एफसी संघात असलेल्या या स्ट्रायकरने फेडेरिको गेलेगो याच्या असिस्टवर ब्राऊन याने गोलरक्षक रेहेनेश याच्या थेट फटक्यावर संधीच दिली नाही.

पणजी : नॉर्थईस्ट युनायटेडने तब्बल सात सामन्यानंतर नवे अंतरिम प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखाली सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत रविवारी अखेर विजय नोंदविला. सामन्यात वर्चस्व राखत त्यांनी जमशेदपूर एफसीला 2-1 फरकाने हरविले.

सामना रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर झाला. नॉर्थईस्ट युनायटेडसाठी पहिला गोल बचावपटू आशुतोष मेहता याने 36व्या मिनिटास केला, नंतर 61व्या मिनिटास बदली खेळाडू जमैकन स्ट्रायकर देशॉर्न ब्राऊन याने नव्या संघातर्फे यशस्वी पदार्पण करताना नॉर्थईस्ट युनायटेडची आघाडी वाढविली. 89 व्या मिनिटास कर्णधार इंग्लंडच्या पीटर हार्टली याने जमशेदपूरची पिछाडी एका गोलने कमी केली. 

'झिरो टू आयर्न मॅन'चा पहिला एपिसोड; आयर्न मॅन स्पर्धा म्हणजे नक्की काय?

नॉर्थईस्टने शेवटचा सामना 5 डिसेंबर रोजी ईस्ट बंगालविरुद्ध (2-0) नोंदविला होता. त्यानंतर चार बरोबरी व तीन पराभवानंतर नॉर्थईस्टने रविवारी विजय साजरा केला. एकंदरीत त्यांचा हा 12 लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 15 गुण झाले असून ते  पाचव्या क्रमांकावर आले आहेत. ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूर एफसीचा सलग तिसरा, तर एकंदरीत पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे 12 लढतीनंतर 13 गुण कायम राहिले. त्यांची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. यापूर्वी जमशेदपूरला केरळा ब्लास्टर्स व एफसी गोवाकडून हार पत्करावी लागली होती.

विश्रांतीला नऊ मिनिटे बाकी असताना 29 वर्षीय बचावपटू आशुतोष मेहता याने आयएसएलमधील वैयक्तिक पहिला गोल नोंदवत गुवाहाटीच्या संघाचे गोलखाते उघडले. फेडेरिको गेलेगो याच्याकडून मिळालेल्या चेंडूवर आशुतोषने उंच उडी घेत अचूक हेडिंग साधले. त्यापूर्वी चार मिनिटे अगोदर पोर्तुगीज खेळाडू लुईस माशादो याची किक जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने ऐनवेळी अडविल्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेडला आघाडी मिळू शकली नव्हती. 

राहुलचा 'बाहुबली' शो; महाकाय अमेरिकन बिल्डरला दाखवली जागा (Viral Video)

तासाभराच्या खेळानंतर जमैकाचा तीस वर्षीय आघाडीपटू देशॉर्न ब्राऊन याने नॉर्थईस्टसाठी पदार्पण संस्मरणीय ठरविले. अगोदर बंगळूर एफसी संघात असलेल्या या स्ट्रायकरने फेडेरिको गेलेगो याच्या असिस्टवर ब्राऊन याने गोलरक्षक रेहेनेश याच्या थेट फटक्यावर संधीच दिली नाही. यावेळी मध्यक्षेत्रात इसाक वनमाल्सॉमा याची चूक जमशेदपूरसाठी महागात पडली. ब्राऊन ४६व्या मिनिटास इद्रिसा सिला याच्या जागी मैदानात आला होता.

सामना संपण्यात एक मिनिट बाकी असताना कर्णधार पीटर हार्टली याने जमशेदपूरची पिछाडी सेटपिसेसवर एका गोलने कमी केली. ऐतॉर मॉनरॉय याच्या कॉर्नर किकवर हार्टलीचे हेडिंग रोखणे गोलरक्षक सुभाशिष रॉय याला शक्य झाले नाही.
 


​ ​

संबंधित बातम्या