ISL 2021 : जमशेदपूर FC आणि हैदरादाबाद FC लढतीत नुसता टाईमपास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

19 व्या मिनिटास हैदराबादच्या हालिचरण नरझारी याला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश दक्ष ठरला. त्याच्या हाताला लागून चेंडू नंतर गोलपोस्टला आपटल्यामुळे दिशाहीन ठरला.

पणजी :   सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील जमशेदपूर एफसी आणि हैदराबाद एफसी यांच्यातील  सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.  रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर रंगलेल्या सामन्यात  गमावलेल्या संधी आणि कमजोर नेमबाजी याचे दर्शन अनुभवायला मिळाले. 

सलग तीन पराभवानंतर  बरोबरीचा एक गुण मिळाल्याचे समाधान ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील जमशेदपूरला लाभले. त्यांची ही 13 लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. आतापर्यंत झालेल्या लढतीत 14 गुणासह जमशेदपूरचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.  दुसरीकडे  हैदराबादची ही सलग तिसरी बरोबरी ठरली. पाच सामने अपराजित असलेल्या मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाची एकंदरीत 13 लढतीतील सहावी बरोबरी ठरली. 18 गुणांसह ते चौथ्या स्थानावर आहेत. 

पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल डागण्याच्या  संधी होत्या, परंतु नेमबाजी अचूक ठरू शकली नाही, त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली. विश्रांतीस तीन मिनिटे बाकी असताना हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याने जागा सोडलेली असताना ऐतॉर मॉनरॉयच्या कॉर्नर किकवर स्टीफन एझे याने साधलेला हेडर गोलपट्टीस आपटल्यानंतर आशिष राय याने चेंडू दिशाहीन केला. त्यापूर्वी जमशेदपूरच्या फारुख चौधरी याचा फटकाही सदोष ठरला होता.

19 व्या मिनिटास हैदराबादच्या हालिचरण नरझारी याला गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश दक्ष ठरला. त्याच्या हाताला लागून चेंडू नंतर गोलपोस्टला आपटल्यामुळे दिशाहीन ठरला. सामन्याच्या नवव्या मिनिटास जमशेदपूरने चांगली मुसंडी मारली होती. यावेळसही ऑस्ट्रेलियन जोएल चियानेज याला रेहेनेश याने यशस्वी होऊ दिले नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये हैदराबादचा गोलरक्षक लक्ष्मी कांत कट्टीमनी पुढे आलेला असताना फारुख चौधरीने मारलेला फटका लक्ष्य साधू शकला नाही, त्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.  भारत भारत  भारत भारत भारत भारत 


​ ​

संबंधित बातम्या