ISL 2021 : हैदराबादची नॉर्थईस्टशी गोलशून्य बरोबरी

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Sunday, 7 February 2021

हैदराबाद आणि नॉर्थईस्ट यांच्यातील 16 लढतीमध्ये प्रत्येकी आठवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 23 गुण झाले आहेत.

पणजी : हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघातील एकाही खेळाडूला गोल डागण्यात यश आले नाही. त्यामुळे प्रत्येकी एक-एक गुणासर सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत दोन्ही संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. सामन्यात विजय मिळवून स्थान भक्कम करण्याची संधी दोन्ही संघाकडे होती. पण त्यांना ते शक्य झालं नाही. 

हैदराबाद आणि नॉर्थईस्ट यांच्यातील 16 लढतीमध्ये प्रत्येकी आठवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 23 गुण झाले आहेत. त्यांनी एफसी गोवावर एका गुणाची आघाडी मिळविली आहे. हैदराबादला (+4) सरस गोलसरासरीमुळे तिसरा, तर नॉर्थईस्टला (+1) चौथा क्रमांक मिळाला. एफसी गोवा (22 गुण)संघ आता पाचव्या स्थानी गेला आहे. पहिल्या टप्प्यात वास्को च्या मैदानात हैदराबादने नॉर्थईस्टला 4-2 असे पराभूत केले होते. पण ही पुनरावृत्ती करणे त्यांना जमलं नाही. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने  तीन विजय आणि पाच सामने बरोबरीत सोडवले आहेत. दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांच्या मार्गदर्शनाखालील नॉर्थईस्ट संघाने सलग दुसरा सामना बरोबरीत सोडवला. 

IND vs ENG: टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये फायटिंग; शास्त्रींनी केलं दुर्लक्ष (VIDEO)

सुरुवातीला हैदराबाद संघाने चेंडूवर नियंत्रण राखत वर्चस्व प्रस्थापित केले. पण प्रतिस्पर्धी संघाली गोलपोस्टपर्यंत पोहचण जमल नाही. अंतिम क्षणात नॉर्थईस्टने आघाडीसाठी आक्रमक खेळ केला. अखेरच्या पाच मिनिटात फेडेरिको गालेगो याच्या फ्रीकिकवर बेंजामिन लँबॉट याने हेडिंग दिशाहीन ठरताच सामना बरोबरीत सुटला.


​ ​

संबंधित बातम्या