ISL 2021 : 8 लढतीनंतर विजयाचा थाट; ईस्ट बंगालकडून पराभवाची बंगळुरुने केली परतफेड

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Tuesday, 2 February 2021

यापूर्वी बंगळुरुला फातोर्डाच्या मैदानात ईस्ट बंगालकडून एका गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

पणजी : सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग आठ लढतीनंतर बंगळुरुने विजयाचा आनंद साजरा केला.  सामन्याच्या पूर्वार्धात डागलेल्या दोन गोलमुळे बंगळूर एफसीने ईस्ट बंगालला  2-0 फरकाने नमवत विजयी जल्लोष साजरा केला. वास्को येथील टिळक मैदानावर मंगळवारी बंगळुरु आणि ईस्ट बंगाल यांच्यातील लढत रंगली होती. 

ब्राझालीयन मध्यरक्षक क्लेटन सिल्वा याच्या हाफ व्हॉली फटक्यावरील गोलमुळे बंगळूर एफसीने 12 व्या मिनिटातच सामन्यात आघाडी मिळवली. गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूच्या फ्रीकिकवर सुनील छेत्रीच्या असिस्टवर हा गोल झाला. ईस्ट बंगालच्या डॅनियल फॉक्स याच्याशी झालेल्या बाचाबाचीच्या पार्श्वभूमीवर हा गोल खास ठरला. 

IPL 2021 Auction : या 3 अनकॅप्ड खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

दुसऱ्या गोलमध्ये बंगालनेच बंगळुरुला मदत केली. शेवटच्या मिनिटाला बंगळूरचा बदली खेळाडू पारस श्रीवास याचा फटका गोलपोस्टला आपटून ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजित मजुमदार याच्या पायाला लागला. आणि चेंडू गोलपोस्टमध्ये जाऊन बंगळुरुच्या खात्यात दुसरा गोल जमा झाला. 

यापूर्वी बंगळुरुला फातोर्डाच्या मैदानात ईस्ट बंगालकडून एका गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाची बंगळुरुने परतफेड केली. सगल आठ सामने खेळल्यानंतर बंगळुरुने विजयाला गवसणी घातली. यापूर्वी तीन बरोबरी आणि पाच पराभवानंतर हा विजय मिळाला आहे. स्पर्धेतील 15 लढतीनंतर चौथ्या विजयासह बंगळुरुच्या खात्यात 18 गुण जमा झाले आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या