ISL2020 : ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यात उद्या रंगणार सामना  

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 25 December 2020

इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये उद्या ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यात बॉक्सिंग डे सामना रंगणार आहे.

इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये उद्या ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यात बॉक्सिंग डे सामना रंगणार आहे. तर कोलकात्याच्या संघाला अजून विजयाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानंतर चेन्नईयीन एफसी संघही पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील आहे.  

NBA मध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू डोपिंग मध्ये दोषी  

ईस्ट बंगाल व चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मागील तीन सामन्यांमध्ये ईस्ट बंगालच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. मात्र या सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवता आला नव्हता. शेवटच्या केरळा ब्लास्टर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात अतिरिक्त वेळाच्या इंज्युरी टाईम मध्ये केरळा संघाने गोल केल्यामुळे ईस्ट बंगालला सामना बरोबरीच्या एका गुणावर सोडावा लागला होता. आणि त्यामुळे संघाला अजून विजयाची वाट पाहावी लागली आहे. आतापर्यंत सहा लढतीत दोन बरोबरी आणि चार पराभवामुळे ईस्ट बंगाल संघ क्रमवारीत तळाला आहे.        

ऑस्ट्रेलियन ओपन 2021: रॉजर फेडररसह दिग्गज टेनिसपटू उतरणार मैदानात 

याउलट,  चेन्नईयीन एफसीने मागील लढतीत एफसी गोवास हरविले होते. यामुळे त्यांचा विश्वास नक्कीच उंचावलेला असणार आहे. आणि ईस्ट बंगालला नमवून गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याचे त्यांचे लक्ष्य राहील. सध्या चेन्नईयीनच्या खात्यात आठ गुण जमा आहेत. चेन्नईयीन एफसीच्या संघाला आतापर्यंत दोन सामन्यात पराभव, दोन सामन्यात बरोबरी आणि दोन सामन्यात विजय मिळवता आलेला आहे.   

महत्वाचे - 

    - आयएसएलच्या सातव्या मोसमात चेन्नईयीनचे 5, तर ईस्ट बंगालचे 3 गोल
    - स्पर्धेत ईस्ट बंगालवर प्रतिस्पर्ध्यांचे सर्वाधिक 11 गोल
    - चेन्नईयीसाठी यंदा 5 वेगवेगळ्या खेळाडूंचे गोल
    - चेन्नईयीनची 2, तर ईस्ट बंगालची 1 लढतीत क्लीन शीट
 


​ ​

संबंधित बातम्या