ISL Season 7 : नॉर्थईस्ट युनाइटेडचा मुंबई सिटीवर विजय    

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सातव्या सत्रात नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघाने मुंबई सिटी एफसीचा पराभव केला आहे.

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सातव्या सत्रात नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघाने मुंबई सिटी एफसीचा पराभव केला आहे. आणि त्यासोबतच नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघाने यंदाच्या हंगामातील आपली विजयी सुरवात केली आहे. नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील यंदाच्या मोसमातील दुसरा सामना शनिवारी वास्को डी गामा येथील टिळक मैदान स्टेडियमवर खेळवण्यात आला. 

नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात झालेल्या सामन्यात, नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघातील घानाचा फॉरवर्ड क्वेसी आपियाने पेनल्टीवर गोल नोंदवला. त्यामुळे नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने मुंबई सिटी एफसीचा 1-0 ने पराभव केला.  तसेच या सामन्यात एकूण सात खेळाडूंनी पदार्पण केले. आणि त्यातील पाच खेळाडू नॉर्थईस्ट युनायटेड एफसी कडून मैदानात उतरले होते.

ISL Season 7 मुंबई सिटी फेव्हरिट, बंगलुरुच्या कमबँकची उत्कंठा शिगेला

सामन्याच्या आठव्या मिनिटाला मुंबई संघाच्या बुमूस, तर यानंतर पुढील तिसऱ्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडच्या लुईस मिगुएल व्हिएराने गोल करण्याची संधी गमावली. मात्र नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघातील क्वेसी आपियाने 49 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. व त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटच्या माध्यमातून आला, ज्यामध्ये मुंबई संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मुंबईच्या संघाला बरोबरी साधता आली असती. मात्र त्यांना अपयश आले. मुंबईचा डिफेन्डर सार्थक गोलूई याने मारलेला हेडर थोडक्या अंतराने हुकला. तर 81 व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचा उपयोग बामासला करता आला नाही. याव्यतिरिक्त सामन्याच्या 43 व्या मिनिटाला मुंबईच्या अहमद जाहुआला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर आता नॉर्थईस्ट युनाइटेड एफसी संघाचा सामना गुरुवारी केरला ब्लास्टर्स सोबत होणार आहे. 

            


​ ​

संबंधित बातम्या