SL 2020 'बायो बबल'मध्ये दिवस घालवणं कठिण: सुनील छेत्री

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन
Thursday, 12 November 2020

छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय की,  ' आम्ही मागील तीन आठवड्यापासून बायो-बबलमध्ये आहे. या वातावरणात राहणे खूप कठिण असल्याचे मी मान्य करतो. प्रत्येक दिवशी दोन वेळा मैदानात उतरुन आम्ही सरावाच्या माध्यमातून फिट राहण्याचा प्रयत्न करत आहोत.  देशातील सर्वात लोकप्रिय असलेली फुटबॉल लीगच्या सातव्या हंगामाची सुरुवात ही 20 नोव्हेंबरपासून एटीके मोहन बागान आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने गोव्यातील तीन मैदानात खेळवण्यात येणार आहेत.  

इंडियन सुपर लीग (आयएसएल) च्या आगामी हंगामात  बंगळुरु एफसीला आणखी एक यश मिळवून देण्यासाठी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री सज्ज झालाय. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लागू करण्यात आलेल्या जैव सुरक्षा वातावरणात राहणे सोपे नाही, असे त्याने म्हटले आहे. आवश्यकतेप्रमाणे सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तो म्हणाला. छेत्री आपल्या संघासोबत मागील तीन आठवड्यांपासून गोव्यात आहे. छेत्री प्रत्येक दिवशी दोन सत्रात सराव करत असून यातून मिळालेला मोकळा वेळात तो पुस्तक वाचनावर भर देतोय. 

IPL झालं पण आपल्याला काय मिळालं; खूप काही शिकवणारा खास व्हिडिओ

छेत्रीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटलंय की,  ' आम्ही मागील तीन आठवड्यापासून बायो-बबलमध्ये आहे. या वातावरणात राहणे खूप कठिण असल्याचे मी मान्य करतो. प्रत्येक दिवशी दोन वेळा मैदानात उतरुन आम्ही सरावाच्या माध्यमातून फिट राहण्याचा प्रयत्न करत आहोत.  देशातील सर्वात लोकप्रिय असलेली फुटबॉल लीगच्या सातव्या हंगामाची सुरुवात ही 20 नोव्हेंबरपासून एटीके मोहन बागान आणि केरला ब्लास्टर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने गोव्यातील तीन मैदानात खेळवण्यात येणार आहेत.  

फॅमिलीसह टीम इंडिया पोहचली ऑस्ट्रेलियात; बीसीसीआयनं शेअर केले खास फोटो

आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनंतर सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम करणारा छेत्री म्हणाला की, स्पर्धेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. (10 दिवसांपेक्षा कमी वेळ ) स्पर्धेसाठी मैदानात उतरण्यासाठी माझ्यासह सर्व टीम उत्सुक आहे. एका बाजूला स्पर्धेची तयारी सुरु असताना  बिल ब्रायसन लिखित 'द बॉडी' हे पुस्तक वाचू काढले  आणि तुम्हालाही वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे, असे छेत्रीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 2018 मध्ये बंगळुरु एफसीनं जेतेपद मिळवले होते. 

​ ​

संबंधित बातम्या