कृत्रिम शीत यंत्रणेवर भारतीय संघाची मदार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

कतारमधील कृत्रिम शीत यंत्रणेवर भारतीय फुटबॉल संघाची मदार आहे. विश्वकरंडक पात्रता स्पर्धेद्वारे आशिया कप पात्रतेचे लक्ष्य भारतीय संघाने बाळगले आहे.

दोहा - कतारमधील कृत्रिम शीत यंत्रणेवर भारतीय फुटबॉल संघाची मदार आहे. विश्वकरंडक पात्रता स्पर्धेद्वारे आशिया कप पात्रतेचे लक्ष्य भारतीय संघाने बाळगले आहे.

कोरोनामुळे भारताच्या विश्वकरंडक पात्रतेतील अखेरच्या तीन लढती कतारमध्ये होणार आहेत. भारतीय संघ कतार, बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या लढती होणाऱ्या जासीम बिन हमाद स्टेडियमवर खास शीत यंत्रणा वसवण्यात आली आहे. कतारमध्ये कितीही उष्णता असली तरी स्टेडियममध्ये गारवा असतो. त्यामुळे कायम फ्रेश राहता असे भारतीय फुटबॉल संघातील मध्यरक्षक रोलीनंग बोर्जेस याने सांगितले.

भारतीय संघाने विश्वकरंडक पात्रता सलामीस कतारला गोलशून्य रोखले होते. त्यावेळी ८५ व्या मिनिटास आम्ही फ्रेश होतो. अजूनही आपण खेळू शकतो असे वाटत राहते, असे बोर्जेस याने सांगितले.

आम्ही यापूर्वी कतारमध्ये खेळलो होतो, त्या वेळी बाहेर कितीही उष्णता असली तरी स्टेडियममध्ये गारवा होता. उकाड्याचा कोणताही त्रास झाला नव्हता, याकडे ब्रँडन फर्नांडिसने लक्ष वेधले.


​ ​

संबंधित बातम्या