I League Qualifiers : मोहामेडन स्पोर्टिंगची अकरा वर्षांनी एन्ट्री; भवानीपूरवर सहज मात

दीपक कुपन्नावर 
Friday, 16 October 2020

मोहामेडनला मैदान आणि मैदानाबाहेरही संघर्ष करावा लागला. पहिल्या सामन्यात नवख्या गढवाल अतिरिक्त वेळेत गोल करून संघर्षपूर्ण विजय मिळविला. तर दुसऱ्या  दुसया सामन्यानंतर आपले प्रशिक्षक य़ान ला यांना  तडकाफडकी बडर्तफ केले. पाठोपाठ मोहामेडनने श्री. ला यांच्याविरुध्द पोलीसांत तक्रार दिली. संघाची खासगी माहिती, रणनिती  मिर्नवा पंजाब एफसीचे माजी प्रमुख राजीव बजाज यांना दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पोलीस तक्रारीने  फुटबॉल क्षेत्रात खळबळ माजली होती. अशा गढुळ वातावरणातही  खेळाडुंनी संयम राखत आपल्या हजारो पाठीराख्यांना जल्लोषाची संधी दिली.
 

कोलकत्यात  सुरु असलेल्या इंडियन  फुटबॉल लिग (आय लिग) पात्रता स्पर्धेतील महत्वपूर्ण सामन्यात आज अपेक्षेप्रमाणे कोलकत्याच्या मोहामेडन स्पोर्टिंगने तुल्यबळ भवानीपूर एफसीवर दोन दोन गोलने मात केली. मोहम्मेडनने स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयासह  सर्वाधिक नऊ गुण पटकावुन आय लिग प्रथम श्रेणी स्पर्धेत अकरा वर्षांनी दिमाखात एन्ट्री मिळवली. दरम्यान, अहमदाबादचा अरा एफसी विरुद्ध दिल्लीचा गढवाल एफसी हा सामना 1-1असा बरोबरीत सुटला. 

गुगलचा काही नेम नाही ; शुभमनची पत्नी सर्च केल्यास दिसते सारा तेंडुलकर 

यंदा भारतीय फुटबॉल मधील दिग्गज संघ म्हणुन आळखले जाणारे कोलकत्याचे मोहन बागान, ईस्ट बंगाल हे इडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतुन आय लिग प्रथम श्रेणीसाठी पारंपारिक कोलकत्याचा की नवा संघ गवसणार ? याचीच फुटबॉलक्षेत्राला उत्कंठा लागून राहिली होती. पात्रता स्पर्धेत मोहामेडन आणि भवानीपूरने आपापले साखळी दोन्हीं सामने जिंकून प्रथम श्रेणीत कोलकत्याचे स्थान ऩिश्चित केले होते. त्यामुळे या दोघांमधील सामन्यात विजेता संघ आय-लीग साठी पात्र ठरणार होता. 

यूएफा नेशन्स लीग : एरिक्सनच्या गोलमुळे डेन्मार्कचा इंग्लंडवर विजय

सामान्यात सुरुवातीपासूनच अनुभवी मोहमेडनने चेंडूवर ताबा ठेवत वर्चस्व मिळविले . 27 व्या मिनिटाला माबियाने तर उत्तरार्धात 67 व्या मिनिटाला गणीने मैदानी गोल करून  संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. "ब्लॅक पॅन्थर’ मोहामेडन स्पोर्टिंगला तब्बल 129 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे.  एकेकाळी भारतीय फुटबॉलवर अधिराज्य गाजवणाऱ्या या सघाने देशातील सर्वच प्रतिष्ठेच्या स्पर्धावर नाव कोरले आहे . सन 2009 मध्ये सुमार कामगिरीमुळे या संघाची आय लिग मधून गच्छंती झाली होती. 


​ ​

संबंधित बातम्या