आय लिगमध्ये नव्या संघाची एन्ट्री ?

दीपक कुपन्नावर 
Tuesday, 6 October 2020

पात्रता स्पर्धा : कोलकत्यात पाच संघात जुगलबंदी ; फुटबॉल  शौकीनांत उत्कंठा

कोलकत्यात उद्यापासून (ता. 8) सुरु होणाया इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) पात्रता स्पर्धेकडे देशातील फुटबॉल वर्तुळाचे लक्ष वेधुन आहे. या स्पर्धेत कोलकत्याचे मोहामेडन स्पोर्टिंग, भवानीपूर एफसी, अहमदाबादचा अरा एफसी, दिल्लीचा गहेरवाल एफसी, बंगलुरचा एफसी बंगलुरु युनायटेड या पाच संघात जुगलबंदी रंगणार आहे. यंदा भारतीय फुटबॉल मधील दिग्गज संघ म्हणुन आळखले जाणारे कोलकत्याचे मोहन बागान, ईस्ट बंगाल हे इडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेत उतरणार आहेत. त्यामुळेच या स्पर्धेतुन आय लिग प्रथम श्रेणीसाठी पारंपारिक कोलकत्याचा की नवा संघ गवसणार? याचीच फुटबॉलक्षेत्राला उत्कंठा लागून राहिली आहे.

कोरोनामुळे गेले सात महिने भारतातील संपुर्ण क्रिडाविश्व ठप्प आहे. या पाश्र्वभुमिवर देशात प्रथमच  प्रेक्षकांविना होणाया आयलिग फुटबॉल पात्रता स्पर्धा कशी होणार याची क्रिडाक्षेत्रात उत्सुकता आहे. मुळातच आयएसएल स्पर्धेमुळे आयलिग स्पर्धेला दुय्यम स्थान मिळत असल्याची संघाची भावना आहे. त्यातच आयलिग स्पर्धेतील कोलकत्याचे दोन्हीं यशस्वी संघ बाहेर पडल्याने आय लिगची क्रेझ कमी झाल्याची चर्चा सुरु आहे. सहभागी संघाचा गटातील कामगिरीचा आढावा घेतल्यास कोलकत्याचा 129 वर्षांचा गौरवशाली इतिहास असणारा ‘ब्लॅक पॅन्थर’ मोहामेडन स्पोर्टिंग 'फेवरिट' मानला जातो आहे. मुळचे पुण्याचे सध्या एरा संघाचे प्रशिक्षक विवेक नागुल यांनी इतिहास घडविण्याची संधी समजुन रणशिंग फुंकले आहे. ‘ब्रिंग बॅक बंगलुरु’ म्हणत युनायटेड एफसीनेही शड्डू ठोकला आहे.

मोहामेडन स्पोर्टिंग देशातील सर्वात जुना क्लब, प्रथम श्रेणी आय लिगचा अनुभव (2008-2009),पंजाब एफसीचे माजी प्रशिक्षक यान ला यांच्याकडे सुत्रे आहेत. त्रिनिदादचा विलिस प्लाझा, नेपाळचा अभिषेक रिजेल, नायजेरियाचा जॅन चिडे यांच्यावर मदार आहे. एकशे दहा वर्षाचीं दमदार वाटचाल करणाऱ्या  भवानीपुर एफसीचा भरवसा आफ्रिकन अंशुमन क्रोमह, फिलीप अडेजा यांच्यासह शिल्टन पाल  या खेळाडूवर आहे. प्रथमच अव्वल साखळीत पोहचलेल्या अहमदाबादचा अरा एफसीचा परदेशी कॅमरा, इजेह स्टॅनली यांच्यावर भिस्त आहे. प्रशिक्षक डेव्हीड हूड यांच्या य़ुनायटेडने बंगलुरुच्या लिगमध्ये उपविजेतेपद पटकाविले. सहायक प्रशिक्षक गौरमागींसिंग यांच्यामदतीने युवा खेळाडूंची मोट बांधली आहे. गटसाखळीत आयएसएलच्या राखीव संघाचा अनपेक्षितपने मात करुन वर्चस्व गाजविणाऱ्या गहरवाल एफसीची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतुन भारतीय  फुटबॉल पंढरी समजल्या जाणाऱ्या  कोलकत्याचा की अहामदाबाद, दिल्ली, बंगलुरु येथील संघ पात्र ठरणार हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

स्पर्धेचे वेळापत्रक
तारीख        सामना            वेळ

8 आक्टोंबर  

भवानीपूर एफसी वि.एफसी बंगलुरु युनायटेड   दु. 12.30 वा.

मोहामेडन स्पोर्टिंग वि. गहेरवाल एफसी   सायंकाळी 4.30 वा.

11 आक्टोंबर

मोहामेडन स्पोर्टिंग वि.एरा एफसी   दु. 12.30 वा.

गहेरवाल एफसी वि. एफसी बंगलुरु युनायटेड सायंकाळी 4.30 वा.

14 आक्टोंबर

गहेरवाल एफसी वि.भवानीपूर एफसी  दु. 12.30 वा

एफसी बंगलुरु युनायटेड वि. एरा एफसी   सायंकाळी 4.30 वा.

16 आक्टोंबर  
एरा एफसी वि. गहेरवाल एफसी    दु. 12.30 वा.
      
भवानीपूर एफसी वि. मोहामेडन स्पोर्टिंग  सायंकाळी 4.30 वा.

19 आक्टोंबर

एफसी बंगलुरु युनायटेड वि.मोहामेडन स्पोर्टिंग   दु. 12.30 वा.

एरा एफसी वि.भवानीपूर एफसी   सायंकाळी 4.30 वा.
 


​ ​

संबंधित बातम्या