ISL 2021 : FC बंगळुरु संघर्ष संपवून तिसऱ्या स्थानी झेप घेणार?

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Wednesday, 27 January 2021

पणजी : हैदसराबाद एफसी  बंगळुरु एफसीला पराभूत करुन सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान होण्यास प्रयत्नशील असेल.  
 

सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत बंगळूर एफसी संघर्ष संपवून क्रमवारीत सुधारणा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.  वास्को येथील टिळक मैदानावर सामना रंगणार आहे. मागील पाच सामन्यात अपराजित राहून हैदराबाद एफसीचे 13 सामन्यानंतर 18 गुण कमावले आहेत.  मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला पूर्ण तीन गुण मिळाल्यास त्यांच्या खाती एफसी गोवाच्या तुलनेत एक गुण जास्त जमा होईल. 

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात हैदराबादने बंगळुरुला नमविले होते, मात्र मागील तीन लढतीत त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे त्यांच्यासाठीही विजय अत्यावश्यक असेल. तीनपैकी दोन लढतीत त्यांनी गोल स्वीकारलेला नाही. आपला संघ शैलीनुसार खेळत असल्याचे सांगून, हैदराबादच्या गोलक्षेत्रात बंगळुरु संघाचा धोकादायक प्रवेश टाळण्यावर भर राहील, असे मार्किझ यांनी नमूद केले आहे. 

ICC Women’s ODI Rankings : टॉप 10 मध्ये ऑस्ट्रेलिच्या 'चार-चौघी'सह स्मृती-मितालीचाही समावेश

मुख्य अंतरिम प्रशिक्षक नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील माजी विजेत्या बंगळुयरुची कामगिरी निराशाजनक राहिलीय. मागील सात लढतीत बरोबरीचे फक्त दोन प्राप्त केलेल्या या संघाने फक्त चार गोल नोंदविले असून दहा गोल स्वीकारले आहेत. सध्या त्यांच्या खात्यात 13 लढतीनंतर 14 गुण आहेत. प्ले-ऑफ फेरीसाठी दावा कायम राखण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत लढत जिंकावी लागेल. संघाने अजूनही प्ले-ऑफच्या आशा सोडलेल्या नाहीत, असे मूसा यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला नमूद केले. सध्या संघ व्यवस्थापन संघातील युवा खेळाडूंना पुढील मोसमाच्या तयारीसाठी वेळ देत असल्याची माहितीही त्यांनी दिली.  


​ ​

संबंधित बातम्या