करीम बेनझेमाच्या दुखापतीची फ्रान्सला चिंता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 June 2021

फ्रान्सने युरो फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यात बल्गेरियाचा ३-० असा पराभव केला; पण त्यांचा आघाडीचा खेळाडू करीम बेनझेमा या सामन्यात जखमी झाला. त्यामुळे जागतिक विजेत्यांची चिंता वाढली आहे.

पॅरिस - फ्रान्सने युरो फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यात बल्गेरियाचा ३-० असा पराभव केला; पण त्यांचा आघाडीचा खेळाडू करीम बेनझेमा या सामन्यात जखमी झाला. त्यामुळे जागतिक विजेत्यांची चिंता वाढली आहे.

युरो स्पर्धेतील जागतिक विजेत्यांची पहिली लढत जर्मनीविरुद्ध १५ जूनला आहे. त्याची पूर्वतयारी या सामन्याद्वारे करण्याचे फ्रान्सचे लक्ष्य होते; पण बेनझेमाच्या पायाला ३९ व्या मिनिटास दुखापत झाली. त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. सहा वर्षांनंतर संघात पुनरागमन केलेल्या बेनझेमाचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. हेडर करण्याच्या प्रयत्नात तो पडला आणि त्याला दुखापत झाली.

बेनझेमाऐवजी मैदानात आलेल्या ऑलिव्हर गिरॉडने दोन गोल करीत फ्रान्सचा विजय साकारला. गिरॉडचे आता एकंदर ४६ गोल झाले आहेत. थिएरी हेन्रीच्या सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमापासून तो पाच गोल दूर आहे. अर्थात बेनझेमा संघात परतल्यावर गिरॉड राखीव खेळाडूच होईल.  

लेवांडोवस्की गोलविना
रॉबर्टो लेवांडोवस्की याला एकही गोल करता आला नाही आणि पोलंडला आईसलँडविरुद्ध २-२ बरोबरी मान्य करावी लागली. सामन्याच्या अंतिम टप्प्यात लेवांडोवस्कीला बदलण्यात आले. त्याच्याऐवजी आलेल्या कॅरोल स्विदेरस्की याने पोलंडला बरोबरीचा गोल करून दिला. कर्णधार सर्जिओ बस्क्वेटस््ची उणीव जाणवणार नसल्याचे दाखवून देताना स्पेनने लिथुआनियास ४-० असे हरवले.


​ ​

संबंधित बातम्या