Football World Cup : भारताच्या विश्‍वकरंडक पात्रता लढती कतारमध्ये

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 March 2021

भारताच्या विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत आगेकूच करण्याच्या आशा धूसर असल्या तरी याच स्पर्धेतून आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवण्याची भारतास संधी आहे.

मुंबई : भारताच्या विश्‍वकरंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील उर्वरित तीनही लढती कतारला होतील. आशियाई फुटबॉल महासंघाने या स्पर्धेतील उर्वरित सर्व पात्रता लढती एकाच ठिकाणी घेण्याचे ठरवले आहे. भारताच्या या पात्रता स्पर्धेतील कतार (भारतात), बांगलादेश (बांगलादेशात) आणि अफगाणिस्तान (भारतात) लढती शिल्लक होत्या. मात्र कोरोना महामारीमुळे या लढतींचे संयोजन सतत लांबणीवर पडत आहे.

INDvsENG : वॉशिंग्टन-बेयरस्ट्रोचा फाइटिंग सीन (VIDEO)

भारताच्या विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत आगेकूच करण्याच्या आशा धूसर असल्या तरी याच स्पर्धेतून आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवण्याची भारतास संधी आहे. विश्‍वकरंडक 2022 मध्ये घेणाऱ्या कतारमध्ये भारताचा समावेश असलेल्या इ गटातील पात्रता लढती होतील, तर ‘फ’ गटाच्या पात्रता लढती जपानमध्ये होणार आहेत. ‘इ’ गटातील ओमान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हेही भारताप्रमाणे आपल्या शिल्लक लढती कतारमध्ये खेळतील. भारतीय संघ सध्या ‘इ’ गटात तीन गुणांसह चौथा आहे. आशिया कपमध्ये आठ गटविजेते आणि चार उपविजेत्यांना प्रवेश मिळेल. गटातील तिसरा संघ आशिया कपच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरतील.
 


​ ​

संबंधित बातम्या