आयएसएलमध्ये  ईस्ट बंगालची शक्यता

दीपक कुपन्नावर
Friday, 4 September 2020

फुटबॉल वेड्या बंगालमधील शतकाहुनही अधिक गौरवशाली इतिहास मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या कट्टरप्रतिस्पर्धी संघाना आहे. लाखो चाहते असणाऱ्या या दोन संघातील  लढत "कोलकत्ता डर्बी" जागतिक फुटबॉलमध्येही लक्षवेधी मानली जाते. गतवर्षी एटीके संघाने मोहन बागान संघाचे शेअर्स खरेदी केल्याने हे दोन्हीं संघाचे एकत्रिकरण झाले. साहजिकच ईस्ट बंगाल संघानेही आयएसएलमध्ये उतरावे असा चाहत्यांचा दबाव आहे. लाखों चाहत्याची संख्या लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूकावर नजर ठेवुन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याने ईस्ट बंगालच्या आशा बळावल्या आहेत.

फुटबॉल स्पोटस डेव्हलपमेंन्ट इंडिया लिमिटेड (एफएसडीएल) मार्फत इंडियन सुपर लिगला (आयएसएल ) नव्या संघासाठी निविदा काढण्यात आली आहे.  त्यासाठी सतरा सप्टेंबरपर्यत  भरण्याची मुदत आहे. दिल्ली, लुढियाना, कोलकत्ता, अहमदाबाद, भोपाळ, सिलुगडी येथील  फुटबॉल संघाना निविदा भरता येतील. नोव्हेंबरपासून गोव्यात कोरोनामुळे बंद दरवाज्याआड होणाया या स्पर्धेच्या सातव्या हंगामात  या नव्या संघाला प्रवेश मिळेल. कोलकत्ताच्या मातबर ईस्ट बंगालची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाकडे भारतीय फुटबॉल विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

IPL 2020 : कोहली सरावानंतर असा दूर करतो थकवा; पाहा खास फोटो 

आयपीएलच्या भरघोस यशाचा आदर्श घेऊन देशातील बहुतांशी राष्टीय क्रिडासंघटनानीं त्याच धर्तीवर  स्पर्धा सुरु केल्या. अखिल भारतीय  फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) देखील सहा वर्षापूर्वी आयएसएल स्पर्धेचा श्रीगणेशा केला. रिलायन्स उद्योगसमुहाच्या पुढाकाराने एफएसडीएल हि संस्था  या स्पर्धेचे निंयत्रण करते. आंतरराष्टीय दर्जाचे प्रेक्षपण, करोडो रुपयांची पारितोषिके, युरोप व आफ्रिकेतील नामवंत फुटबालपटूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा अल्पावधीत लोकप्रिय ठरली. खासकरुन भारतीय  खेळाडूंना परदेशी प्रशिक्षक, खेळाडुकडून खुप काहीं शिकण्य़ाची सुवर्णसंधी मिळाली. गतवर्षी एआयएफएफने जुन्या  इडियन फुटबाल लिगला (आय लिग) मागे सारुन आयएसएलला भारतीय फुटबॅलमधील अव्वल स्पर्धेचा दर्जा बहाल केला.

चेन्नईला आणखी एक धक्का; भज्जीचीही IPL मधून माघार

सध्या या स्पर्धेत ऐटिके मोहन बागान, एफसी गोवा, बंगलुरु एफसी, चेन्नईन एफसी, जमशेदपूर एफसी, ओडासा एफसी, हैद्राबाद एफसी, केरला ब्लास्टर्स, नॅर्थ ईस्ट युनायटेड , मुंबई सिटी एफसी असे दहा संघ आहेत. दोन महिन्यावर आलेल्या स्पर्धेसाठी संघाची बांधणी सुरु झाली आहे.खासकरुन प्रशिक्षक, परदेशी खेळाडू यांना करारबध्द करण्यासाठी चढाआढ सुरु आहे. कोलकत्याचा एटिके हा स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्टीक साकारणारा सर्वाधिक यशस्वी संघ आहे. यावर्षी तब्बल सात संघानी स्पेनच्या प्रशिक्षकांना पसेती दिली आहे.

चाहत्यांचा दबाव

फुटबॉल वेड्या बंगालमधील शतकाहुनही अधिक गौरवशाली इतिहास मोहन बागान आणि ईस्ट बंगाल या कट्टरप्रतिस्पर्धी संघाना आहे. लाखो चाहते असणाऱ्या या दोन संघातील  लढत "कोलकत्ता डर्बी" जागतिक फुटबॉलमध्येही लक्षवेधी मानली जाते. गतवर्षी एटीके संघाने मोहन बागान संघाचे शेअर्स खरेदी केल्याने हे दोन्हीं संघाचे एकत्रिकरण झाले. साहजिकच ईस्ट बंगाल संघानेही आयएसएलमध्ये उतरावे असा चाहत्यांचा दबाव आहे. लाखों चाहत्याची संख्या लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूकावर नजर ठेवुन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याने ईस्ट बंगालच्या आशा बळावल्या आहेत.

​ ​

संबंधित बातम्या