रोनाल्डोने मोडला पेलेंचा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 March 2021

रोनाल्डोने पेलेचा सर्वाधिक गोलचा विक्रम मोडल्याचे सांगितले असले तरी सर्वांनाच हे मान्य नाही.

 पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोने कॅगिलिआरीविरुद्ध तीन गोल करीत पेले यांचा 767 गोलांचा विक्रम मोडला. रोनाल्डोचे आता 770 गोल झाले आहेत. या कामगिरीबद्दल पेले यांनी रोनाल्डोचे कौतुक केले आहे. जीवन हा एक संघर्षमय प्रवास आहे. तो प्रत्येकाला स्वतंत्रपणे करावा लागतो. तुझा आत्तापर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. तुला खेळताना पाहून मला आनंद होतो, हे काही आता सिक्रेट राहिलेले नाही. माझा विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन, असे पेले यांनी म्हटले आहे. 

  Video: बुमराह-संजनाच्या शानदार लग्नसोहळ्याची छोटीशी झलक

रोनाल्डोने पेलेचा सर्वाधिक गोलचा विक्रम मोडल्याचे सांगितले असले तरी सर्वांनाच हे मान्य नाही. जोसेन बिकान यांनी 821 गोल केले आहेत, असा चेक फुटबॉल संघटनेचा दावा आहे. रेक स्पोर्टस्‌ सॉकर या सांख्यिकी संकेतस्थळानुसार बिकान यांनी रॅपिड व्हिएन्ना संघाकडून केलेले 27 गोल हौशी लढतीत आहेत. त्याचबरोबर त्यांचे अनेक गोल अधिकृत आंतरराष्ट्रीय लढतीत नाहीत.  


​ ​

संबंधित बातम्या