ख्रिस... ख्रिस आय लव्ह यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 June 2021

व्यावसायिक फुटबॉल संघातील सहकारी ख्रिस्तियन एरिक्सन याची प्रकृती ठीक नसल्याचे दुःख बाजूला ठेवत रोमेलु लुकाकू याने बेल्जीयमला रशियाविरुद्ध ३-० असे विजयी केले.

बेल्जियमचा विजय साकारलेल्या लुकाकूची एरिक्सनला साद  
बाकू - व्यावसायिक फुटबॉल संघातील सहकारी ख्रिस्तियन एरिक्सन याची प्रकृती ठीक नसल्याचे दुःख बाजूला ठेवत रोमेलु लुकाकू याने बेल्जीयमला रशियाविरुद्ध ३-० असे विजयी केले.

डेन्मार्कचा मध्यरक्षक एरिक्सन सामना सुरु असताना मैदानात खाली पडला. त्यामुळे बेल्जीयम रशिया सामना अनिश्चित होता. पण तो शुद्धिवर असल्याचे समजल्यावर लढत सुरु झाली. त्यात बेल्जीयमने अपेक्षेनुसार बाजी मारली.

लुकाकू आणि एरिकसन हे इंटर मिलान संघातून खेळतात. लुकाकूने बेल्जीयमचा पहिला गोल केल्यानंतर त्याने कॅमेऱ्यासमोर येत ख्रिस, ख्रिस आय लव्ह यू असे म्हटले. तो म्हणाला, ख्रिसचे ऐकल्यावर मला धास्तीच वाटली. आम्ही अनेक सुख-दुःख अनुभवली आहेत. कुटुंबापेक्षा त्याच्या सानिध्यात जास्त असतो. या लढतीतील कामगिरी त्याला अर्पण.

क्रोएशियाविरुद्ध इंग्लंडचा विजय
इंग्लंडने विजयी सलामी देताना क्रोएशियास १-० असे पराजित केले. रहीम स्टर्लिंगने केलेल्या गोलमुळे इंग्लंडने विजय मिळवला. स्टर्लिंगला घेतल्यामुळे संघव्यवस्थापनास लक्ष्य केले, पण त्याने मार्गदर्शक गेरेथ साऊथगेट यांचा विश्वास सार्थ ठरवताना ५७ व्या मिनिटास निर्णायक गोल केला. जॅक ग्रिलीशऐवजी ऐनवेळी स्टर्लिंगला पसंती देण्यात आली होती. स्टर्लिंगने इंग्लंडला विजयी सलामी साध्य करुन दिली.


​ ​

संबंधित बातम्या