‘सर्व काही एरिक्सनसाठी’ डेन्मार्कची मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 June 2021

सर्व काही ख्रिस्तियनसाठी अशी नवी टॅगलाईन घेऊन खेळणाऱ्या डेन्मार्कने सलामीच्या दोन पराभवानंतरही युरो फुटबॉलची अंतिम फेरी गाठली. ज्या मैदानावर ख्रिस्तियन एरिक्सनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्याच मैदानावर रशियाचा ४-१ असा पाडाव करीत डेन्मार्कने गटउपविजेतेपद पटकावले.

कोपनहेगन - सर्व काही ख्रिस्तियनसाठी अशी नवी टॅगलाईन घेऊन खेळणाऱ्या डेन्मार्कने सलामीच्या दोन पराभवानंतरही युरो फुटबॉलची अंतिम फेरी गाठली. ज्या मैदानावर ख्रिस्तियन एरिक्सनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्याच मैदानावर रशियाचा ४-१ असा पाडाव करीत डेन्मार्कने गटउपविजेतेपद पटकावले.

एरिक्सनला फिनलंडविरुद्धच्या लढतीच्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर डेन्मार्क खेळाडू खेळण्यास तयार नव्हते; पण एरिक्सन शुद्धीवर आहे, हे समजल्यावर ते खेळायला तयार झाले. त्यानंतर एरिक्सनने सहकाऱ्यांना खेळत राहण्याचा आग्रह धरला. त्यानंतर खेळाडूंनी आता सर्व काही एरिक्सनसाठी, हे मनाशी बाळगत खेळायला सुरुवात केली.

डेन्मार्कला आव्हान राखण्यासाठी रशियाविरुद्ध विजय आवश्यक होता. एरिक्सनऐवजी संघात आलेल्या मिकेल दॅमासगार्ड याने ३८ व्या मिनिटास बहारदार गोल करीत डेन्मार्कला जोरदार सुरुवात करून दिली.

रशिया गोलरक्षकाच्या चुकीमुळे युसुफ पौलसनने डेन्मार्कची आघाडी वाढवली. त्या गोलनंतर चाहत्यांनी हवेत उडवलेल्या बिअरने तो न्हाऊन निघाला. अर्थात हे पुरेसे नव्हते. फिनलंडने बेल्जियमला पराजित केले असते, तर डेन्मार्कला आव्हान राखण्यासाठी अधिक गोल हवे असते. 

उत्तरार्धात डेन्मार्क जास्त आक्रमक होते. त्यातच रशियाने गोल करीत डेन्मार्कचे आव्हान खडतर केले; तरीही त्यांनी उत्तरार्धात दोन गोल करीत बाजी मारली. विजय सफाईदार होता, पण बेल्जियम - फिनलंड निकाल सर्व काही ठरवणार होता. सफाईदार विजयानंतरही डेन्मार्क संघ तसेच त्यांचे चाहते शांत होते. 

लढत संपल्यावर दोन मिनिटांनी बेल्जियमने फिनलंडला पराजित केल्याची बातमी पसरली. सरस गोलसरासरीमुळे डेन्मार्क गटात अव्वल झाले होते. त्यानंतर संघाने आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. 

अशी झाली लढत
तपशील         रशिया       डेन्मार्क

चेंडूवर वर्चस्व    ३९%         ६१%
यशस्वी पास      २०९          ४२७
धाव (किमी)      १०२.९       १०२.०
शॉट                   ६            १६
ऑन टार्गेट          २             १०
कॉर्नर्स                १             ७ 
फाऊल्स           १५            १६


​ ​

संबंधित बातम्या