लोकॅतेल्लीच्या दोन गोलमुळे इटलीचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

कोरोना महामारीमुळे युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर पडली, त्यामुळेच इटली संघात आलेल्या मॅन्यूएल लोकॅतेल्ली याने दोन गोल करत इटलीस स्वित्झर्लंडविरुद्ध ३-० असे विजयी केले. या विजयामुळे इटलीने या स्पर्धेची बाद फेरी गाठलेला पहिला संघ होण्याचा मान मिळवला.

रोम - कोरोना महामारीमुळे युरो फुटबॉल स्पर्धा एक वर्ष लांबणीवर पडली, त्यामुळेच इटली संघात आलेल्या मॅन्यूएल लोकॅतेल्ली याने दोन गोल करत इटलीस स्वित्झर्लंडविरुद्ध ३-० असे विजयी केले. या विजयामुळे इटलीने या स्पर्धेची बाद फेरी गाठलेला पहिला संघ होण्याचा मान मिळवला.

रॉबर्टो मॅन्सीनी यांचे मार्गदर्शन लाभणाऱ्या इटलीने सलग दोन लढतींत ३-० बाजी मारली. त्यांनी आपली ताकद दाखवून देणाराच खेळ या दोन्ही सामन्यांत केला. दुसऱ्या सामन्याचा हिरो असलेल्या मध्यरक्षकाचा पहिला गोल जबरदस्तच होता. त्यानेच सुरू केलेल्या चालीची सहकाऱ्यांसह सांगता करताना क्रॉस पासला वेगवान अचूक दिशा दिली होती. त्या वेळी तो जवळपास अर्धे मैदान वेगात धावला होता. उत्तरार्धात त्याने गोलरेषेवरून दोन बचावपटूंच्या मधून चेंडू वेगाने गोलजाळ्यात धाडला होता.

कोरोनाचा अनेकांना फटका बसला, पण मॅन्यूएलसारख्या काही खेळाडूंना त्याचा नक्कीच फायदा झाला. त्याची पहिल्यांदा संघात निवड सप्टेंबरमध्ये झाली. काही सामन्यांतच त्याने आपला दबदबा निर्माण केला. तो पदार्पणापासून इटलीच्या १३ पैकी ११ सामन्यांत खेळला आहे.

मॅन्यूएलने इटली संघव्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली आहे. त्याच्यावर आक्रमणास साह्य करण्याची जबाबदारी मार्को वेरात्ती जखमी असल्यामुळे सोपवण्यात आली आणि मॅन्यूएलने दोन गोल केले.

अशी झाली लढत
तपशील           इटली     स्वित्झर्लंड

चेंडूवर वर्चस्व     ४९%        ५१%
यशस्वी पास       ४६४        ४७५
धाव (किमी)      ११२.४       १०६.०
शॉटस्               १३             ६
ऑन टार्गेट          ३              १
कॉर्नर्स                ३             २
फाऊल्स             १०           १२

महामारीचा मला एकप्रकारे फायदाच झाला आहे. सरावाची कोणतीही संधी नसताना मी जास्त मेहनत घेतली आणि त्यातून माझ्यात जास्त जिद्दही निर्माण झाली.
- मॅन्यूएल लोकॅतेल्ली, इटलीचा मध्यरक्षक


​ ​

संबंधित बातम्या