गुडघे झुकवणाऱ्या इंग्लंड संघाची हुर्यो

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 June 2021

युरो फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्याच्या सुरुवातीस कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्यासाठी इंग्लंड खेळाडूंनी पुन्हा गुडघे झुकवले. त्याचबरोबर स्पर्धेच्यावेळीही हेच करणार असल्याचे जाहीर केले. मात्र इंग्लंड खेळाडूंच्या या मोहिमेस चाहत्यांनी विरोध सुरू केला आहे.

लंडन - युरो फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्याच्या सुरुवातीस कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्यासाठी इंग्लंड खेळाडूंनी पुन्हा गुडघे झुकवले. त्याचबरोबर स्पर्धेच्यावेळीही हेच करणार असल्याचे जाहीर केले. मात्र इंग्लंड खेळाडूंच्या या मोहिमेस चाहत्यांनी विरोध सुरू केला आहे. 

इंग्लंड संघाच्या दोनही सराव लढती रिव्हरसाईड स्टेडियम येथे झाल्या. इंग्लंड खेळाडूंनी कृष्णवर्णीयांना पाठिंबा देण्यासाठी गुडघे झुकवल्यावर त्यांची हुर्यो झाली. मात्र त्यानंतरही स्पर्धेत आमचे खेळाडू हे करीतच राहतील, असे मार्गदर्शक गेरार्थ साऊथगेट यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी खेळाडूंच्या भावना समजून घेण्याचे आवाहन चाहत्यांना केले. 

गतवर्षापासून कृष्णवर्णीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी खेळाडूंनी गुडघे झुकवण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील बहुतेक लढती प्रेक्षकांविना झाल्या होत्या. आता मात्र त्याच्या विरोधातील प्रतिक्रिया सुरू झाली आहे. कोणाचा विरोध आहे म्हणून आमचा संघ थांबणार नाही. याबाबत माझा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा आहे. याबाबत कोणतीही जास्त चर्चा करणार नाही, असेही साऊथगेट यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या