युरो चौकडीतील चुरस शिगेला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 July 2021

कोरोना महामारी असताना फुटबॉलकडे लक्ष वेधण्यास युरो स्पर्धा यशस्वी झाली आहे. उपांत्य फेरीत दाखल झालेले स्पेन, इटली, डेन्मार्क आणि इंग्लंड यांची खेळाची शैली भिन्न आहे.

कोरोना महामारी असताना फुटबॉलकडे लक्ष वेधण्यास युरो स्पर्धा यशस्वी झाली आहे. उपांत्य फेरीत दाखल झालेले स्पेन, इटली, डेन्मार्क आणि इंग्लंड यांची खेळाची शैली भिन्न आहे, त्यामुळे एकच शैली नव्हे तर त्यातील कौशल्य आणि अंमलबजावणी जिंकते हेच ही स्पर्धा दाखवत आहे. युरोच्या उपांत्य लढती काही तासांवर असताना यातील लढणाऱ्या संघावर ही वेगवान नजर

डेन्मार्क
जमेच्या बाजू - सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले. धाडसी खेळ तसेच नियोजनबद्ध बचाव
कमकुवत बाजू - मध्यरक्षक हुशारीची उणीव, दडपणाखाली खेळ खालावतो
संधी - आक्रमकांनी हुशारी दाखवल्यास काहीही घडू शकते. 
धोका - बेल्जीयमविरुद्ध साखळीत हार, पण ताकदवान संघाचे क्वचितच आव्हान

इंग्लंड 
जमेच्या बाजू - विंगरचा वाढता प्रभाव तसेच हॅरी केन - स्टर्लिंगमधील समन्वय
कमकुवत बाजू - मध्यरक्षकांकडून क्वचितच धक्कादायक चाली
संधी - हॅरी केन बहरल्यास काय घडू शकते हे उपांत्यपूर्व लढतीत दिसले
धोका - आक्रमणातील ताकद उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पूर्ण दाखवण्याचे परिणाम होऊ शकतात

इटली
जमेच्या बाजू - भक्कम बचाव कितीही आक्रमणे पेलतो. आक्रमणातील विंगरचा वाढता सहभाग
कमकुवत बाजू - आक्रमणात प्रसंगी बचावपटूही सहभागी होत असल्याने बचाव अचानक उघडा पडण्याचा धोका 
संधी - आक्रमणांना महत्त्वाच्या लढतीत ताकद दाखवण्याची संधी, खेळ उंचावण्याचे आव्हान
धोका - सलग ३२ लढतीत अपराजित असल्यामुळे गाफील राहू शकतात. 

स्पेन
जमेच्या बाजू - बचावफळीपासून सुरू होणारे संयमी, तसेच भक्कम आक्रमण, विंगर्सची हुशारी
कमकुवत बाजू - अचानक कोलमडणारा बचाव तसेच अखेरच्या सेकंदापर्यंत जोष राखणे अवघड
संधी - मोराताला आपण सातत्यपूर्ण खेळ करू शकतो हे दाखवण्याची चांगली संधी
धोका - नियोजनबद्ध बचाव स्पेनचा टीका टाका निष्प्रभ करू शकतो. चेंडूवर जास्त ताबा राहण्याचाही फटका बसू शकेल


​ ​

संबंधित बातम्या