यूएफा नेशन्स लीग : एरिक्सनच्या गोलमुळे डेन्मार्कचा इंग्लंडवर विजय    

टीम ई-सकाळ
Friday, 16 October 2020

यूएफा नेशन्स लीग मध्ये डेन्मार्कने इंग्लंडवर 1-0 ने विजय मिळवला आहे.

यूएफा नेशन्स लीग मध्ये डेन्मार्कने इंग्लंडवर 1-0 ने विजय मिळवला आहे. डेन्मार्ककडून खेळणाऱ्या क्रिस्टियन एरिक्सनने आपला 100 वा सामना खेळताना गोल नोंदवला. या सामन्यात पहिल्या हाफ पासूनच इंग्लंडच्या संघाला 10 खेळाडूंसह खेळावे लागले. रेफरीने सामन्याच्या वेळेस डिसीजन रिव्यू सिस्टम (डब्ल्यूएआर) च्या माध्यमातून डेन्मार्कला पेनल्टी दिली. तर इंग्लंडच्या हॅरी मॅग्युरेला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. 

गुगलचा काही नेम नाही ; शुभमनची पत्नी सर्च केल्यास दिसते सारा तेंडुलकर 

डेन्मार्क आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या एरिक्सनने 35 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोल मध्ये रूपांतर करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर दोन्हीही संघांना गोल नोंदवता आला नाही. एरिक्सनने केलेला हा त्याचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधील 34 वा गोल होता. या पराभवामुळे इंग्लंड डेन्मार्क आणि बेल्जियमनंतर तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. 

यूस, फ्रेंच नंतर कोलोन टेनिस स्पर्धेत अँडी मरेचा पहिल्या फेरीतच पराभव   

यासोबतच दुसऱ्या एका सामन्यात बेल्जियमने आईसलँडचा 2-1 ने पराभव केला. बेल्जियम आणि आईसलँड यांच्यात झालेल्या सामन्यात बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूने खेळाच्या सुरवातीलाच 9 व्या मिनिटाला पहिला गोल केला. मात्र त्यानंतर आईसलँडच्या सेव्हर्सनने 17 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. पण ही बरोबरी फार काळ टिकली नाही. बेल्जियमच्या रोमेलू लुकाकूने पुन्हा एकदा 38 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी वर गोल करत संघाला पुन्हा बढत मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कोणत्याही संघाकडून एकही गोल झाला नाही. आणि त्यामुळे हा या सामन्यात बेल्जियमने आईसलँडवर विजय मिळवला.      

 

 


​ ​

संबंधित बातम्या