इंग्लिश प्रीमिअर लीग : टोटनहॅमचा आर्सेनलवर दमदार विजय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 December 2020

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत टोटनहॅम संघाने आर्सेनल संघावर मात करत यंदाच्या आवृत्तीतील आपला सातवा विजय मिळवला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत टोटनहॅम संघाने आर्सेनल संघावर मात करत यंदाच्या आवृत्तीतील आपला सातवा विजय मिळवला आहे. आणि या विजयासोबतच टोटनहॅम संघाने क्रमवारीतील आपले पहिले स्थान बळकट केले आहे. टोटनहॅम आणि आर्सेनल यांच्यात काल झालेल्या सामन्यात टोटनहॅमने आर्सेनलचा 2 - 0 ने पराभव केला. 

ला लिगा : बार्सिलोनाची ला लिगा पीछेहाट कायम 

टोटनहॅम आणि आर्सेनल यांच्यात झालेल्या सामन्यात, टोटनहॅम संघातील सन हुईन्ग मिनने खेळाच्या सुरवातीला 13 मिनिटांनी पहिला गोल नोंदवून संघाला आघाडी  मिळवून दिली. यानंतर टोटनहॅम संघाच्याच हॅरी केनने 45+1 मिनिटाला गोल करत संघाला बढत मिळवून दिली. त्यानंतर सामना संपेपर्यंत कोणत्याही संघाला एकमेकांविरुद्ध गोल करता आला नाही. त्यामुळे टोटनहॅम संघाने आर्सेनलवर सहजरित्या विजय मिळवला. 

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत टोटेनहॅमचा संघ पहिल्या स्थानावर आहे. टोटेनहॅमच्या संघाने 11 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत 24 अंकांसह पहिले स्थान राखले आहे. त्यानंतर आता लिव्हरपूल संघाने देखील 11 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. लिव्हरपूल आणि टोटेनहॅम संघाचे गुण समानच 24 आहेत. मात्र टोटेनहॅम संघाने लिव्हरपूल पेक्षा अधिक गोल केलेले असल्यामुळे टोटेनहॅमचा संघ अग्रस्थानी आहे. यानंतर चेल्सीचा संघ 11 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत 22 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे.  तर, लिसेस्टर सिटीचा संघ 21 अंकांसह चौथ्या स्थानावर आहे. आणि मँचेस्टर युनायटेड 19 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.         


​ ​

संबंधित बातम्या