इंग्लिश प्रीमिअर लीग : डॅनीच्या पेनल्टी गोलने साऊथहॅम्पटनचा ब्रायटनवर विजय    

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 December 2020

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत साऊथहॅम्पटन संघाने ब्रायटन संघावर दमदार कामगिरी करत विजय मिळवलेला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत साऊथहॅम्पटन संघाने ब्रायटन संघावर दमदार कामगिरी करत विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासोबतच साऊथहॅम्पटनच्या संघाने क्रमवारीत पाचवे स्थान मिळवले आहे. साऊथहॅम्पटन आणि ब्रायटन यांच्यात आज झालेल्या सामन्यात साऊथहॅम्पटनने 2 - 1 अशा अंकाने ब्रायटनवर विजय मिळवला. 

मेस्सी - रोनाल्डो एकमेकांविरुद्ध उतरणार मैदानात

साऊथहॅम्पटन आणि ब्रायटन यांच्यात झालेल्या सामन्यात, ब्रायटन संघातील पास्कल ग्रॉबने सामन्याच्या पहिल्या सत्रात 26 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र ब्रायटन संघाला शेवट पर्यंत ही आघाडी टिकवता आली नाही. साऊथहॅम्पटन संघाचा जॅनिक वेस्टरगार्ड याने 45 व्या मिनिटाला गोल केला. आणि संघाला 1 - 1 ने बरोबरीत आणले. त्यानंतर 81 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल करून डॅनीने साऊथहॅम्पटन संघाला 2 - 1 ने बढत मिळवून दिली. व शेवटपर्यंत ही बढत कायम राखल्याने साऊथहॅम्पटन संघाने यंदाच्या आवृत्तीतील सहावा विजय मिळवला.         

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत टोटेनहॅमचा संघ पहिल्या स्थानावर आहे. टोटेनहॅमच्या संघाने 11 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत 24 अंकांसह पहिले स्थान राखले आहे. त्यानंतर लिव्हरपूल संघाने देखील 11 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले आहे. लिव्हरपूल आणि टोटेनहॅम संघाचे गुण समानच 24 आहेत. मात्र टोटेनहॅम संघाने लिव्हरपूल पेक्षा अधिक गोल केलेले असल्यामुळे टोटेनहॅमचा संघ अग्रस्थानी आहे. यानंतर चेल्सीचा संघ 11 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत 22 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे.  तर, लिसेस्टर सिटीचा संघ 21 अंकांसह चौथ्या स्थानावर आहे. आणि साऊथहॅम्पटनचा संघ 20 अंकांसह पाचव्या स्थानावर पोहचला असून, मँचेस्टर युनायटेडचे 19 गुण असल्यामुळे ते सहाव्या स्थानावर घसरलेले आहेत. 

 


​ ​

संबंधित बातम्या