इंग्लिश प्रीमिअर लीग : न्यू कॅसलवर विजय मिळवत चेल्सी दुसऱ्या स्थानी झेप  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत चेल्सी संघाने न्यू कॅसलवर धमाकेदार विजय मिळवलेला आहे.

इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत चेल्सी संघाने न्यू कॅसलवर धमाकेदार विजय मिळवलेला आहे. आणि विजयासोबतच चेल्सीचा संघ सातवा क्लब बनलेला आहे ज्याने यंदाच्या हंगामात क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. चेल्सी आणि न्यू कॅसल यांच्यातील सामना शनिवारी खेळवण्यात आला. 

ISL Season 7 मुंबई सिटी फेव्हरिट, बंगलुरुच्या कमबँकची उत्कंठा शिगेला

चेल्सी आणि न्यू कॅसल यांच्यात झालेल्या सामन्यात, चेल्सीच्या संघाने चांगली सुरवात केली. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला न्यू कॅसल संघाच्या फेड्रिक फर्नांडिसने आत्मघातकी गोल केल्यामुळे चेल्सी संघाला आघाडी उघडता आली. त्यामुळे चेल्सीचा संघ पहिल्या सत्रात 1-0 असा पुढे होता. त्यानंतर दुसर्‍या हाफमध्ये चेल्सीच्या टॅमी अब्राहमने 65 व्या मिनिटाला गोल करुन संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. तर, चेल्सी विरुद्धच्या या सामन्यात न्यू कॅसल संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे चेल्सी संघाने न्यू कॅसलला 2-0 ने नमवले. 

दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेच्या क्रमवारीत टोटेनहॅमचा संघ पहिल्या स्थानावर आहे. टोटेनहॅमच्या संघाने 9 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत 20 अंकांसह पहिले स्थान राखले आहे. त्यानंतर चेल्सीच्या संघाने 9 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत 18 अंकांसह दुसरे स्थान मिळवले आहे. तर, लिसेस्टर सिटीचा संघ देखील 18 अंकांसह तिसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त लिव्हरपूलचा संघ 17 गुणांसह चौथ्या आणि साऊथहॅम्प्टन 16 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.       


​ ​

संबंधित बातम्या