इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत युक्रेनला ४-० असे हरवले.

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 July 2021

इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवताना युक्रेनला ४-० असे हरवले.  इंग्लंडने साखळीतील सावध खेळास जणू निरोप देत आपला उच्च आत्मविश्वास दाखववला, तसेच विजेत्याची ऐट काय असते तेही दाखवले.

रोम - इंग्लंडने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवताना युक्रेनला ४-० असे हरवले.  इंग्लंडने साखळीतील सावध खेळास जणू निरोप देत आपला उच्च आत्मविश्वास दाखववला, तसेच विजेत्याची ऐट काय असते तेही दाखवले.

इंग्लंडचे उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी डेन्मार्क हे युक्रेनपेक्षा नक्कीच ताकदवान आहेत. इंग्लंडने उपांत्य लढतीपूर्वी क्षमतेविषयीच्या सर्व शंका नक्कीच दूर केल्या. साखळीत न बहरलेल्या हॅरी केनने दोन गोल करीत टीकाकारांना शात केले. 

इंग्लंडने कमालीच्या जिद्दीने खेळ केला. सेंटर हाफजॉन स्टोन्स आणि हॅरी मॅग्वायर यांनी आक्रमणासही साह्य केले. बगलेतून प्रभावी चाली रचताना लेफ्ट बॅक ल्युक शॉने केलेले क्रॉसही तेवढेच प्रभावी होती. चौथ्या मिनिटास स्टर्लिंगच्या अचूक पासवर केनने खाते उघडले. उजव्या बगलेतील जॉर्डन सांचो याने उपयुक्तता सिद्ध केली. 

कमालीचा आक्रमक इंग्लंड संघ प्रतिस्पर्ध्यांना चेंडूवरील वर्चस्वापासून रोखण्यास प्रयत्नशील होता.  त्यामुळे त्यांना सातत्याने ताकीद मिळाली. पण ५० व्या मिनिटापर्यंत तीन गोल झाल्याने इंग्लंडने पिवळे कार्ड मिळालेल्या खेळाडूंना बदलले. पण मैदानात बदली खेळाडू आल्याचे क्वचितच जाणवले. त्यातील जॉर्डन हेंडरसनने गोलही केला. 

प्रतिस्पर्ध्यांना गुंगारा देत केलेले पासिंग, त्यातील अचूकता, तसेच गोलसाठी सतत केलेले प्रयत्न इंग्लडची तयारी दाखवत होते. त्यांच्या सकारात्मक खेळाने युक्रेन झाकोळले.

अशी झाली लढत
तपशील          युक्रेन       इंग्लंड

चेंडूवर वर्चस्व    ४९%        ५१%
यशस्वी पास      ५३८        ५७१
धाव (किमी)     १०५.३      १०६.०
गोलचे प्रयत्न         ७           १०
ऑन टार्गेट           २           ६
कॉर्नर्स                ३            २
टॅकल्स               ११           ४
फाऊल्स             १०         ४

२५ वर्षांनंतर उपांत्य फेरी

  • इंग्लंडला उपांत्य फेरीत नेलेले गेरेथ साऊथगेट हे दुसरे मार्गदर्शक. यापूर्वी आल्फ रॅमसी (१९६६ आणि १९६८)
  • सलग सात सामन्यात इंग्लंडविरुद्ध गोल नाही, त्यांनी प्रथमच सलग ६६२ मिनिटे गोल स्वीकारलेला नाही
  • युक्रेनची प्रमुख स्पर्धेतील ही दुसरी मोठी हार. यापूर्वी २००६ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ०-४ पराभव
  • रहीम स्टर्लिंगचा गेल्या २१ सामन्यातील २२ गोलमध्ये सहभाग. १५ गोल आणि सहांना सहाय्य
  • हॅरी केनचा गेल्या २६ सामन्यांतील २७ गोलमध्ये सहभाग. १८ गोल आणि नऊ साह्य. केनच्या सहा गोलसाठी स्टर्लिंगचे साह्य
  • इंग्लंडविरुद्ध यंदाच्या स्पर्धेतील पाच सामन्यांत एकही गोल नाही. ही कामगिरी करणारा जॉर्डन पिकफोर्ड हा स्पर्धा इतिहासातील पहिला गोलरक्षक
  • हॅरी इंग्लंडने स्पेनची शैली समजला जाणारा टीका - टाका (छोट्या पासवर भर) खेळही करु शकतो ही झल दाखवली. 

सामन्यात आम्हालाच संभाव्य विजेता मानले जात होते. त्यास साजेसा खेळ करण्याचे दडपण होते. मात्र या आव्हानाला यशस्वीपणे सामोरे गेलो. एकही गोल न स्वीकारता मिळवलेला विजय खूपच मोलाचा आहे.
- हॅरी केन


​ ​

संबंधित बातम्या