कोरोनामुळे कोपा फुटबॉल स्पर्धेतील सेमीफायनल सामना स्थगित  

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 8 January 2021

चिलीच्या कोकिंबो आणि अर्जेंटिनाच्या डेफेन्स जस्टिसिया क्लब यांच्यात होणाऱ्या पहिल्या फेरीतील सेमीफायनल सामना दक्षिण अमेरिकेच्या कॉनमेबोल फुटबॉल संस्थेने स्थगित झाला आहे.

चिलीच्या कोकिंबो आणि अर्जेंटिनाच्या डेफेन्स जस्टिसिया क्लब यांच्यात होणाऱ्या पहिल्या फेरीतील सेमीफायनल सामना दक्षिण अमेरिकेच्या कॉनमेबोल फुटबॉल संस्थेने स्थगित झाला आहे. कोकिंबो आणि डेफेन्स जस्टिसिया यांच्यातील सामना येत्या गुरुवारी खेळवण्यात येणार होता. मात्र या सामन्यापूर्वी अर्जेंटिनाच्या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 

ला लिगा फ़ुटबॉल लीग : मेस्सीच्या दोन गोलमुळे बार्सिलोनाचा ऍथलेटिक क्लबवर विजय 

शिवाय कोकिंबो आणि डेफेन्स जस्टिसिया यांच्यातील सामना आता मंगळवारी 12 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. तसेच हा सामना पॅराग्वेच्या असुन्सियन येथे खेळवला जाणार आहे. 

दरम्यान, चिलीच्या स्वास्थ्य अधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमित आढळलेल्या तीन खेळाडूंचा संघातील उर्वरित 56 सदस्यांशी संबंध आल्याचे सांगितले आहे. आणि त्यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे.    


​ ​

संबंधित बातम्या