ख्रिस्तियानो रोनाल्डो ठरला 'गोल्डन फूट ऑफ द इयर'चा मानकरी 

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोनॅको येथे यावर्षीचा गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोनॅको येथे यावर्षीचा गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागील आणि यंदाच्या हंगामात त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. रोनाल्डोने मागच्या हंगामात सिरी-ए, चॅम्पियन्स लीग, इटालियन चषक आणि सुपर कप मिळून 46 सामन्यांत 37 गोल केले होते. त्याच बरोबर सध्या चालू असलेल्या सत्रात सिरी-ए च्या नऊ सामन्यांमध्ये 12 गोल केले आहेत. तर चार चॅम्पियन्स लीगच्या सामन्यांमध्ये चार गोल नोंदवले आहेत.  

इंग्लिश प्रीमिअर लीग : टॅमी अब्राहामच्या सलग दोन गोलने चेल्सीचा वेस्टहॅमवर...

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी खेळाडू लिओनेल मेस्सीला गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार अजूनपर्यंत मिळालेला नाही. गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार हा ज्याचे वय कमीत कमी 28 वर्षे आहे व तो सध्या मैदानावर खेळत आहे अशाच खेळाडूंना देण्यात येतो. त्याशिवाय हा पुरस्कार एखाद्या खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत एकदाच दिला जातो. 

माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांना फिफाचा दणका 

गोल्डन फूट ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच या पोस्ट सोबत रोनाल्डोने आनंद व्यक्त केला असून, सर्वांनी आपल्याला मत दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. या पुरस्कारानंतर रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आता फुटबॉल मधील सगळे पुरस्कार नावावर केले आहेत. रोनाल्डोने पाच वेळा बॅलोन डिओर पुरस्कार जिंकला आहे. तर लिओनेल मेस्सीने रोनाल्डोपेक्षा अधिकवेळा बॅलोन डिओर पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे.    


​ ​

संबंधित बातम्या