पार्टनरसोबत डोंगर दऱ्यातील भटकंती रोनाल्डोला महागात पडणार

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 29 January 2021

वाढदिवस सेलिब्रेशनसाठी ही जोडी माउंटेन रिसॉर्टमध्ये गेली होती. रॉड्रिग्जने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता.

पोर्तुगालचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला विश्रांतीच्या काळात डोंगर कपाऱ्यातील भटकंती चांगली अंगलट येऊ शकते. त्याने कोरोनाच्या नियावलीचे उल्लंघन केल्याचे वृत्त आहे. जुवेंट्सचा स्टार खेळाडू रोनाल्डो आणि त्याची पार्टनर जियोर्जिना रॉड्रिग्ज यांनी मंगळवारी आणि बुधवारी उत्तर पश्चिम इटलीतील वाले डि ऑस्टा परिसरातील कोरमायुर क्षेत्रात वेळ घालवला होता. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावरुन पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर तो हटवण्यातही आलाय. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करुन रोनाल्डोने आपल्या पार्टनरचा 27 वाढदिवस साजरा केल्याचे बोलले जात आहे. 

रोनाल्डो पीडमोंट परिसरात वास्तव्यास आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी काही कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. आपल्या दुसऱ्या घरात जाण्याची नागरिकांना परवानगी आहे. पण परिसरात प्रवास करण्याची मुभा नागरिकांना नाही. रोनाल्डानो पार्टनर जियोर्जिना रॉड्रिग्जसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केल्यानंतर तो अडचणीत सापडणार असल्याची चर्चा रंगली आहे. काही कालावधीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे वृत्त आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fan account (@viva7ronaldo7)

इटली फुटबॉल क्लबच जुवेंट्सचा स्टार स्टायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस सेलिब्रेशनसाठी ही जोडी माउंटेन रिसॉर्टमध्ये गेली होती. रॉड्रिग्जने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. जर रोनाल्डो या प्रकरणात दोषी आढळला तर त्याच्याकडून 400 युरो डॉलरचा दंड आकरला जाऊ शकतो.  

PAK vs RSA: कसोटीतही चोकर्सवाला शो! पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला नमवले

कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वीही रोनाल्डो अडचणीत आला होता. त्याला टीकेचा सामनाही करावा लागला. मागील ऑक्टोबरमध्ये त्याने कोरोना नियमाकडे दुर्लक्ष करत मनमानी केली होती. रोनाल्डोचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. यातून सावरल्यानंतरही तो सुधारण्याची चिन्हे दिसत नाही.


​ ​

संबंधित बातम्या