रोनाल्डोच्या गोलमुळे युव्हेंटिस बचावले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 April 2021

ख्रिस्तियानो रोनाल्डोने ७९ व्या मिनिटास गोल करून युव्हेंटिसची हार टाळली. युव्हेंटिस आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. 

रोम : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गोलमुळे युव्हेंटिसला इटलीतील अव्वल फुटबॉल साखळीत तोरिनोविरुद्ध २-२ बरोबरी साधता आली. दरम्यान, रोमेलू लुकाकूच्या गोलमुळे इंटर मिलानने बोलोग्नाचा १-० असा पराभव केला आणि सिरी एमधील दावेदारी भक्कम करताना अन्य संघांना आठ गुणांनी मागे टाकले. एसी मिलानला सॅम्पोदोरियाविरुद्ध १-१ बरोबरी स्वीकारावी लागली. सलग नवव्या विजयामुळे इंटरला २०१० नंतरचे पहिले जेतेपद आवाक्यात आले. रोनाल्डोने ७९ व्या मिनिटास गोल करून युव्हेंटिसची हार टाळली. युव्हेंटिस आता चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. आघाडीवरील इंटर आणि युव्हेंटिस यांच्यात बारा गुणांचा फरक आहे.  रोनाल्डोने यंदाच्या लीगमधील २४ वा गोल करण्यापूर्वी दोन संधी दवडल्या होत्या.

अष्टपैलू खेळाडू राजस्थान रॉयल्सला तारणार

रेयाल सोशिएदाद विजेते

मिकेल ओयार्झॅबल याच्या गोलमुळे रेयाल सोशिएदादने अॅथलेटिकस बिल्बाओचा १-० असा पराभव केला आणि कोपा डेल रे स्पर्धेत विजेतेपद जिंकले. सोशिएदादने हे विजेतेपद ३४ वर्षांतर प्रथमच जिंकले, त्याच वेळी बिल्बाओ २४ व्या विजेतेपदापासून वंचित राहिले.

आर्सेनेल स्पर्धेबाहेर

लंडन : आर्सेनलला प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलविरुद्ध ०-३ पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे आर्सेनलच्या चॅम्पियन्स लीग पात्रतेच्या आशा मावळल्या आहेत.  बदली खेळाडू दिओगो जोता याने दोन गोल करीत लिव्हरपूलचा विजय साकारला.  


​ ​

संबंधित बातम्या