रोनाल्डोने रचला इतिहास ; गोलची सेंचुरी करणारा ठरला दुसरा फुटबॉलपटू  

टीम ई-सकाळ
Wednesday, 9 September 2020

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत काल मंगळवारी पोर्तुगालने स्वीडनचा 2 - 0 ने पराभव केला.

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत काल मंगळवारी पोर्तुगालने स्वीडनचा 2 - 0 ने पराभव केला. या सामन्यात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीतील 100 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवत इतिहास रचला आहे. स्वीडन विरुद्ध झालेल्या या सामन्यात पोर्तुगालकडून करण्यात आलेले दोन्ही गोल रोनाल्डोने केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा दुसरा खेळाडू फुटबॉलपटू ठरला आहे. यापूर्वी इराणच्या अली देईने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल करण्याचा विक्रम नोंदवला होता. 

आता फ्रान्सच्या फुटबॉल संघातील 'या' खेळाडूला कोरोनाचा संसर्ग  

पोर्तुगाल आणि स्वीडन यांच्यात झालेल्या सामन्यात, पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने सामन्याच्या पहिल्या सत्रात 45 व्या मिनिटाला आणि दुसऱ्या सत्रात 72 व्या मिनिटाला गोल केला. तर, स्वीडनला या सामन्यात एकही गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे पोर्तुगालने स्वीडनवर 2 - 0 ने विजय मिळवला. या विजयासोबतच ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 100 गोल केले. रोनाल्डोने 2004 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला होता. यापूर्वी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याचा विक्रम अलीच्या नावावर आहे ज्याने 109 आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले आहेत. त्यानंतर आता रोनाल्डोच्या खात्यात सध्या 101 आंतरराष्ट्रीय गोल आहेत.      

सेरेना विल्यम्स, डॉमिनिक थिम व मेदवेदेव यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

यानंतर, मलेशियाचा फुटबॉलपटू मोख्तार दहारी रोनाल्डो नंतर तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 86 गोल केले आहेत. याशिवाय, ख्रिस्तियानो रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने 70 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत. त्यामुळे लिओनेल मेस्सी 15 व्या नंबरवर आहे.      

 

 


​ ​

संबंधित बातम्या