रोनाल्डोच्या रागाची किंमत 55 लाख; 6 महिन्यांच्या चिमुकल्याच्या उपचारासाठी मदत

टीम सकाळ स्पोर्ट्स
Saturday, 3 April 2021

रोनाल्डोने सर्बियाविरुद्धच्या लढतीत चेंडू गोलपोस्टमध्ये डागला. पण रेफरीने त्याचा गोल नाकारला. या प्रकारानंतर रोनाल्डो चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले.

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डो याने मैदानात रागाने फेकलेला बॅजला लाखोची किंमत मिळाली आहे. वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात रोनाल्डोने सर्बियाविरुद्धच्या लढतीत गोल केला. पण रेफ्रींनी त्याचा गोल नाकारला होता. यावेळी रोनाल्डोने कर्णधाराचा बॅज मैदानावर फेकून दिल्याचे पाहायला मिळाले होते. एका अज्ञात व्यक्तिने चॅरिटीच्या लिलावात यासाठी  64,000 यूरो (जवळपास 55.22 लाख रुपये) बोली लावली. सर्बियाच्या सरकारी टेलिव्हिजनने  दिलेल्या वृत्तानुसार, सर्बियाच्या मानवाधिकारी समुहाने एका सहा महिन्यांच्या मुलावर उपचार करता यावेत यासाठी रोनाल्डोच्या कर्णधार बॅजची ऑनलाईन लिलावाचे आयोजन केले होते.  

रोनाल्डोने सर्बियाविरुद्धच्या लढतीत चेंडू गोलपोस्टमध्ये डागला. पण रेफरीने त्याचा गोल नाकारला. या प्रकारानंतर रोनाल्डो चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. त्याने आपला कर्णधाराचा बॅज रागाने मैदानात फेकून दिले. त्या फेकून दिलेल्या बॅजची चांगलीच चर्चा रंगली होती.  व्हिडीओ असिस्टंट रेफरी असता तर रोनाल्डोच्या खात्यात तो गोल मिळाला असता आणि पोर्तुगालला सामन्यात विजयही मिळाला असता. पण हा गोल नाकारल्यामुळे सरशेवटी सामना अनिर्णित राहिला होता.  

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का; अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह
  
मॅच दरम्यान रागाने फेकलेला  रोनाल्डोचा आर्म बॅज फायर फायटर जॉर्डजी वुकीकेविच यांना सापडला होता. रोनाल्डोने फेकलेला बॅज लगेच उचलत त्यांनी याचा वापर चॅरिटीसाठी करण्याचे ठरवले. स्पायनल मस्कुलर एट्रॉफी नावाच्या आजाराने त्रस्त असलेल्या 6 महिन्याच्या मुलाच्या उपचारासाठी मोठी रक्कम लागणार असल्याची माहिती मिळाली. त्याला मदत करण्यासाठी हा बॅज लिलावात काढण्यात आला होता.  


​ ​

संबंधित बातम्या