गरिबीतून श्रीमंतीचा 'गोल' साध्य करणारे गडी!

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 5 February 2021

रोनाल्डोचे वडील माळी होते. त्याची आई चार घरात स्वयंपाक करायला जायची.

Cristiano Ronaldo and Neymar birthday: जगभरातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंच्या यादीतील ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार या दोघांचाही आज वाढदिवस. दोन्ही दिग्गजांवर शुभेच्छांचा वर्षावर होतोय. ट्विटरवर सध्या  #CristianoRonaldo #Neymar ट्रेंड होताना दिसतेय. सध्याच्या घडीला फुटबॉलमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये या दोन्ही नावाची वर्णी लागते. 1985 मध्ये रोनाल्डोचा जन्म झाला तर याच दिवशी 1992 नेयमार ज्यूनियर या जगात अवतरला. दोन्ही खेळाडूंची घरची परिस्थिती बेताची होती. यातून मार्ग काढत त्यांनी जगात आपला दबदबा निर्माण केला. 

रोनाल्डोचे वडील माळी होते. त्याची आई चार घरात स्वयंपाक करायला जायची. चार भावा-बहिणींसोबत रोनाल्डो एका छोट्याशा घरात रहायचा. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्याच्या कुटुंबियांनी त्याला शाळेत धाडले. इथूनच त्याच्या आयुष्याला  एक वेगळे वळण मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी त्याने क्लबकडून खेळायला सुरुवात केली. त्याची कामगिरी पाहून त्याचे 17 वर्षाखालील संघात स्थान मिळाले.  रोनाल्डोने 18 व्या वर्षी इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने 17 मिलियन अमेरिकी डॉलरला करारबद्ध केले. अनेक वर्षे स्पेन फुटबॉल क्लब रियल मॅद्रिद संघाकडून खेळताना दिसला. सध्याच्या घडीला तो  फ्रेंच फुटबॉल क्लबच्या PSG कडून खेळताना दिसते.  

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारची कहाणीही काहीशी अशीच आहे. नेयमारचे कुटुंबिय तर एका झोपडपट्टीत रहायचे. त्याचे वडील एक चांगले फुटबॉलपटू होते. पण त्यांना यात करियर करता आले नाही. कुटुंबियांसाठी ते एकाच वेळी अनेक ठिकाणी काम करत. नेयमारच्या कुटुंबियाने असेही काही दिवस पाहिल्यात की वीज भरायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते. अनेकदा त्यांच्या घराची लाईट कनेक्शन कटही करण्यात आले. मात्र नेयमारने या संघर्षातूनही आपल्या यशाचा मार्ग शोधला.  स्ट्रीट फुटबॉलर  रूपात त्याने खेळायला सुरुवात केली. वयाच्या 11 व्या वर्षी नेयमारने ब्राधीलमधील प्रसिद्ध एफसी सेंटोस क्लब ज्वॉइन केला.  2017 मध्ये नेयमारने जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला होता. 


​ ​

संबंधित बातम्या