रोनाल्डोच्या युव्हेंटिसची धक्कादायक हार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

पोर्तोने पूर्वार्ध तसेच उत्तरार्धाच्या सुरुवातीच्या मिनिटात गोल करून विजय निश्‍चित केला. आठ मिनिटे असताना फेडेरिको चिएसे याने युव्हेंटिसचा एकमेव गोल केला, पण या अवे गोलचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकेल.

लिस्बन : ख्रिस्तियानो रोनाल्डो चॅम्पियन्स लीग स्पर्धेत त्याच्या मायदेशातील संघाविरुद्ध अपयशी ठरला. युव्हेंटिसकडून प्रथमच पोर्तुगालमध्ये खेळताना रोनाल्डोच्या संघाला एफसी पोर्तोविरुद्ध 1-2 अशी हार पत्करावी लागली. आम्ही प्रतिस्पर्ध्यांना चांदीच्या ताटातून विजय बहाल केला, असे युव्हेंटिसचे मार्गदर्शक आंद्रे पिर्लो यांनी सांगितले. पोर्तोने पूर्वार्ध तसेच उत्तरार्धाच्या सुरुवातीच्या मिनिटात गोल करून विजय निश्‍चित केला. आठ मिनिटे असताना फेडेरिको चिएसे याने युव्हेंटिसचा एकमेव गोल केला, पण या अवे गोलचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकेल.

IPL 2021 Auction : मॅक्सवेलसाठी कोहलीच्या संघानं मोजली 'विराट' किंमत

युव्हेंटिसने भलीमोठी किंमत देऊन चॅम्पियन्स लीग विजेतेपदासाठी रोनाल्डोला करारबद्ध केले आहे, पण रोनाल्डोला अद्याप हे साधलेले नाही. पोर्तोने रोनाल्डोच्या खेळाचा चांगलाच अभ्यास केला होता आणि त्याची चांगलीच कोंडी केली. आक्रमणावर भर दिल्यास युव्हेंटिसच्या आक्रमणावर मर्यादा येतात याची आम्हाला जाणीव होती, असे रोनाल्डोच्या साथीत रेयाल माद्रिदकडून खेळलेल्या पेपेने सांगितले. 

 
 


​ ​

संबंधित बातम्या