कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा तेरा दिवसांवर; यजमानच अनिश्चित

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 June 2021

अवघ्या तेरा दिवसांवर आलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे अर्जेंटिनाचे यजमानपद रद्द करण्यात आले. त्यामुळे स्पर्धा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात फसली आहे. मात्र दक्षिण अमेरिका संघटनेने स्पर्धेचे नवे यजमान लवकरच जाहीर होतील, असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

साओ पावलो - अवघ्या तेरा दिवसांवर आलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे अर्जेंटिनाचे यजमानपद रद्द करण्यात आले. त्यामुळे स्पर्धा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात फसली आहे. मात्र दक्षिण अमेरिका संघटनेने स्पर्धेचे नवे यजमान लवकरच जाहीर होतील, असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

मूळ कार्यक्रमानुसार कोपा अमेरिका स्पर्धा १३ जून ते १० जुलैदरम्यान अर्जेंटिना आणि कोलंबियात होणार होती. काही दिवसांपूर्वी (२० मे) कोलंबियाने देशातील अशांत परिस्थितीमुळे स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केली, पण त्याचे यजमानपद रद्द करण्यात आले. आता अर्जेंटिनातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तेथेही स्पर्धा न घेण्याचा निर्णय झाला. 

कोपा अमेरिका स्पर्धा घेण्यासाठी काही अन्य देशांचे प्रस्ताव आले आहेत. त्याचा अभ्यास करून आम्ही लवकरच घोषणा करणार आहोत, असे दक्षिण अमेरिका देशातील फुटबॉल संघटना असलेल्या कॉन्मेबॉलने सांगितले. कोरोना रुग्ण वाढत असताना स्पर्धा नको, अशी मागणी अर्जेंटिनात चांगलीच जोर धरू लागली होती.

स्पर्धा रद्द करणे अवघड...

  • चिलीत स्पर्धा घेण्याचा संघटनेचा विचार
  • कोपा अमेरिका संयोजनामुळे संघटनेची चार वर्षांपूर्वीची कमाई ११ कोटी ८० लाख डॉलर
  • चॅम्पियन्स लीगच्या धर्तीवर होणाऱ्या लिबरटॅडोर्स या लीगमधूनही एवढेच उत्पन्न
  • स्पर्धा झाल्यास पात्र देशाची कमाई किमान ४० लाख डॉलर
  • दक्षिण अमेरिका देशातील परिस्थिती पाहून स्पर्धा युरोपातील काही देशांत घेण्याचाही विचार

​ ​

संबंधित बातम्या