ख्रिस्तियन एरिक्सनला फुटबॉल सुरू ठेवण्यासाठी पेसमेकरची साथ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

ख्रिस्तियन एरिक्सनची फुटबॉल कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी पेसमेकर मदत करण्याची शक्यता आहे. आयसीडी अर्थात इम्प्लान्टेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्र्रिलेटरच्या मदतीने त्याचे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यात येणार आहेत.

कोपेनहेगन - ख्रिस्तियन एरिक्सनची फुटबॉल कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी पेसमेकर मदत करण्याची शक्यता आहे. आयसीडी अर्थात इम्प्लान्टेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्र्रिलेटरच्या मदतीने त्याचे हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यात येणार आहेत. युरो स्पर्धेतील फिनलंडविरुद्धच्या लढतीच्यावेळी डेन्मार्क संघाचा प्लेमेकर एरिक्सन याला हृदयविकाराचा झटका आला होता.

आयसीडी हे त्वचेच्या खाली वसवण्यात येते. ते हृदयास पातळ वायरने जोडण्यात येते. त्यातून निघणाऱ्या विद्युत लहरींनी हृदयाचे अनियंत्रित ठोके नियंत्रित होतात, असे ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने म्हटले आहे. या उपचारास एरिक्सनने मंजुरी दिली आहे. या उपचाराची शिफारस जगभरातील आरोग्य तज्ज्ञ करतात.


​ ​

संबंधित बातम्या