पेलेंना गाठण्याची आज छेत्रीला संधी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 June 2021

विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत अफगाणिस्तानला पराजित करून आशिया कप पात्रता निश्चित करण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे उद्या लक्ष्य असेल.

दोहा - विश्वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत अफगाणिस्तानला पराजित करून आशिया कप पात्रता निश्चित करण्याचे भारतीय फुटबॉल संघाचे उद्या लक्ष्य असेल. दरम्यान, भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने या सामन्यात हॅट््ट्रिक केल्यास तो सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दिग्गज पेले यांना गाठू शकेल.

भारतास आशिया कप पात्रता निश्चित करण्यासाठी बरोबरी पुरेशी आहे. ओमानने अफगाणिस्तानला २-१ पराजित केल्यामुळे भारताचा गटातील अव्वल तीन संघातील प्रवेशाचा मार्ग जास्त सुकर झाला आहे.


​ ​

संबंधित बातम्या