चॅम्पियन्स लीग : रेयालवर साखळीत बाद होण्याचा धोका 

संजय घारपुरे
Wednesday, 2 December 2020

13 वेळचे विजेते रेयाल माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या साखळीत बाद होण्याचा धोका आहे.

पॅरिस : 13 वेळचे विजेते रेयाल माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या साखळीत बाद होण्याचा धोका आहे. शाख्तर दॉनेत्सेकला हरवून रेयालला बाद फेरी निश्‍चित करण्याची संधी होती, पण 0-2 पराभवामुळे रेयाल गटात तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. 

ऑस्ट्रेलियन टेनिससाठी विलगीकरणातही सराव? 

सदोष बचावाचा फटका रेयालला बसला, त्याच वेळी युक्रेनमधील शाख्तरने उत्तरार्धात प्रतिआक्रमणे करीत विजय मिळवला. दरम्यान, सहा वेळच्या विजेत्या लिव्हरपूलने अजॅक्‍सचे कडवे आव्हान 1-0 असे परतवले. पोर्तोने मॅंचेस्टर सिटीला गोलशून्य रोखण्यात यश मिळवले. प्रामुख्याने राखीव खेळाडूंशी खेळणाऱ्या बायर्न म्युनिचविरुद्ध 1-1 बरोबरीचेच समाधान ऍटलेटिको माद्रिदला लाभले. 

रेयालने गेल्या 24 चॅम्पियन्स स्पर्धांत किमान बाद फेरी गाठली, पण या वेळी हे घडण्याची शक्‍यता कमी झाली आहे. त्यांनी पाच सामन्यांत नऊ गोल स्वीकारल्याने गोलसरासरी उंचावण्याचेही आव्हान खडतर आहे. त्यांनी शाख्तरविरुद्धच्या दोन्ही लढती गमावल्या आहेत. रेयालची प्रभावी चाल रोखतच शाख्तरने दोन्ही गोल केले. शाख्तर आणि रेयालचे समान सात गुण आहेत, पण शाख्तरने दोघांतील लढतीत वर्चस्व राखल्याने ते दुसरे आहेत.

दरम्यान, याच गटात आघाडीवर असलेल्या बोरुसिया मोशेनग्लॅडबॅशला इंटर मिलानविरुद्ध हार पत्करावी लागली. रोमेलु लुकाकूच्या दोन गोलने इंटरला 3-2 विजयी केले. मोशेनग्लॅडबॅशला बाद फेरीसाठी अखेरच्या रेयालविरुद्ध बरोबरी पुरेशी आहे. शाख्तरला हरवून इंटरही आगेकूच करू शकेल. 

F1 रेसमधील बापमाणसाचा पोरगाही उतरणार Formula 1 च्या रिंगणात

मार्सेलीने स्पर्धेतील सलग 13 पराभवांनंतर विजय मिळवताना ऑलिम्पिकॉसला 2-1 असे हरवले. या विजयामुळे मार्सेलीला युरोपा लीग पात्रतेची संधी आहे. एफसी मिडलॅंडने स्पर्धेत प्रथमच गुण मिळवताना ऍटलांटास 1-1 असे रोखले. या बरोबरीनंतरही ऍटलांटा गटात दुसरे आहेत.

 

 


​ ​

संबंधित बातम्या