चॅम्पियन्स लीग : ख्रिस्तियानो रोनाल्डोचे साडेसातशे गोल पूर्ण 

संजय घारपुरे
Thursday, 3 December 2020

ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकीर्दीतील 750 गोलचा टप्पा पार केला.

पॅरिस : ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकीर्दीतील 750 गोलचा टप्पा पार केला. महिला रेफरी स्टेफानी फ्रॅपार्ट यांच्या चॅम्पियन्स लीग पदार्पणामुळे संस्मरणीय झालेली युव्हेंटिस - डायनामो किएव लढत रोनाल्डो जास्त लक्षवेधक केली. 

मॅराडोना यांना श्रद्धांजली देण्यासाठी जर्सी उतरविणाऱ्या लिओनेल मेस्सीवर कारवाई 

युव्हेंटिसने या 3-0 विजयापूर्वीच बाद फेरी निश्‍चित केली होती. इटालियन विजेत्यांचा दुसरा गोल रोनाल्डोने केला, पण त्याला या महत्त्वाच्या गोलसाठी निर्णय व्हिडीओ रेफरींकडे गेल्यामुळे प्रतीक्षा करावी लागली. किएवविरुद्धच्या गोलचा 13 वर्ष 25 दिवसांचा दुष्काळ रोनाल्डोला यामुळे संपवता आला. 

चॅम्पियन्स लीग : रेयालवर साखळीत बाद होण्याचा धोका 

युव्हेंटिसने अपेक्षेप्रमाणे लढतीवर हुकूमत राखली. किएवला माफक आव्हान दिल्याचेच समाधान लाभले. युव्हेंटिसची पुढील आठवड्यात बार्सिलोनाविरुद्ध लढत होईल. त्यावेळी प्रतिस्पर्धी गटातील अव्वल क्रमांकासाठी प्रयत्न करतील. 

नेमारचे दोन गोल 
नेमारच्या दोन गोलमुळे पीएसजीने मॅंचेस्टर युनायटेडला 3-1 असे पराजित केले. यानंतरही पीएसजीची बाद फेरी निश्‍चित नाही. युनायटेड गटात अव्वल असले तरी ते आणि पीएसजी, तसेच लीपझिग यांचे गुण समान आहेत. दरम्यान, ऑलिव्हर गिरॉड याच्या चार गोलमुळे चेल्सीने सेविलाचा 4-0 असा पाडाव केला. 34 वर्षीय गिरॉर्ड चॅम्पियन्स लीगमध्ये हॅट्ट्रिक केलेला सर्वात बुजुर्ग खेळाडू ठरला आहे. बार्सिलोनाने फेनसॅवरॉसला 3-0 असे सहज पराजित केले. बार्सिलोनाने लिओनेल मेस्सीसह काही प्रमुख खेळाडूंना ब्रेक दिला होता. 

रोनाल्डोचे गोल 
रेयाल माद्रिद - 450 
मॅंचेस्टर युनायटेड - 118 
पोर्तुगाल - 102 
युव्हेंटिस - 75 
स्पोर्टिंग लिस्बन - 5 

फ्रॅपार्ट यांचे ऐतिहासिक पदार्पण 
महिला रेफरी स्टेफानी फ्रॅपार्ट यांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील पुरुष रेफरींची मक्तेदारी संपवली. यूएफा सुपर कप, युरोपा लीग, लीग वन यामधील पहिल्या महिला रेफरी असा बहुमान मिळवलेल्या फ्रॅपार्ट यांनी नवा इतिहास घडवला. ला लिगामधील 18 सामन्यांचा त्यांना अनुभवही आहे.

 

 


​ ​

संबंधित बातम्या