कोरोनाशी लढा दिल्यानंतर ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार संघात परतला  

टीम ई-सकाळ
Sunday, 13 September 2020

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबच्या संघात परतला आहे.

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबच्या संघात परतला आहे. त्यामुळे नेमार आज होणाऱ्या मार्सेलीविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उरतण्याची शक्यता आहे. मात्र पीएसजीचे प्रशिक्षक थॉमस टूचेल यांनी नेमार, विंगर एंजेल डि मारिया, गोलरक्षक केलोर नवास किंवा मिडफिल्डर लीआंड्रो परेडीस प्लेयिंग इलेव्हनमध्ये असतील की नाही याची खात्री नसल्याचे म्हटले आहे. 

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार अमेरिकन क्रिकेटपटू 

गेल्या काही दिवसांपूर्वी पीएसजीचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात फुटबॉलपटू नेमारचा देखील समावेश होता. बार्सिलोना संघात चार वर्षे घालवल्यानंतर 2017 मध्ये नेमारला फ्रान्सच्या पीएसजी संघाने 19.8 मिलियनमध्ये खरेदी केले होते. परंतु नेमार या वर्षाच्या मे महिन्यात स्पॅनिश क्लब बार्सिलोनामध्ये परतणार असल्याचे वृत्त आले होते. 

क्रिकेटबद्दल भज्जी करणार मोठा खुलासा ; ट्विट मधून दिले संकेत 

नेमार फ्रान्सच्या पीएसजी संघात खूश नसल्याची बातमी मध्यंतरी येत होती. तसेच नेमारला त्याचा मित्र असलेल्या लिओनेल मेस्सीबरोबर बार्सिलोना संघात यायचे होते. शिवाय एका स्पॅनिश वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, नेमार स्पेनच्या बार्सिलोना क्लबमध्ये परतण्यासाठी पीएसजी कडून मिळणारी कमाई 600,000 पाउंड कपातीसाठी तयारी असल्याचे म्हटले होते.      


​ ​

संबंधित बातम्या