World Cup qualifier : नेयमार दुखापतीनं त्रस्त, ब्राझीलच्या अडचणी वाढल्या

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Thursday, 8 October 2020

नेयमारच्या दुखापतीमुळे ब्राझीलचे टेन्शन वाढले आहे. नेयमारपूर्वी ब्राझीलच्या ताफ्यातील आणखी दोघांना दुखापत झाली होती.

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू दुखापतीमुळे वर्ल्ड कप कॉलिफायरमध्ये खेळण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेयमार ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर असून तो कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. शुक्रवारी ब्राझीलचा संघ  बोलिविया विरुद्ध वर्ल्ड कप क्वालिफिकेशनचा पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान दुखापतीमुळे नेयमारवर सराव सत्र सोडून जाण्याची वेळ आली. 

चेन्नईचं काही खरं नाही; सगळा खेळ बेभरवशाचा!

ब्राझीलचे टीमचे फिजिओ रौद्रिगो लासमार यांनी नेयमारवर उपचार सुरु असल्याचे म्हटले आहे. तो शुक्रवारी होणाऱ्या सामन्यासाठी खेळण्याची शक्यता धूसर असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील 24 तास त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असून नेयमारच्या दुखापतीमुळे ब्राझीलचे टेन्शन वाढले आहे. नेयमारपूर्वी ब्राझीलच्या ताफ्यातील आणखी दोघांना दुखापत झाली होती. गोलकीपर एलिसन आणि स्ट्रायकर गॅब्रियल जीसस हे देखील दुखापतीमुळे त्रस्त आहेत.   


​ ​

संबंधित बातम्या