चॅम्पियन्स लीग : इंग्लंडच्या सतरा वर्षीय मुसियाला याचा जर्मन गोल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

बायर्नचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की याने त्याचा गोलधडाका कायम राखला; मात्र मुसियालाचा गोल लक्षवेधक ठरला.

रोम : सतरा वर्षीय जामल मुसियाला याने चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील पहिला गोल करीत बायर्न म्युनिचच्या चॅम्पियन्स लीग विजयात मोलाची कामगिरी बजावली. बायर्नने गतविजेतेपद राखण्याच्या मोहिमेची बाद फेरीत जोरदार सुरुवात करताना लाझिओचा उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्याच्या पहिल्या लढतीत 4-1 असा पाडाव केला.

बायर्नचा अव्वल खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की याने त्याचा गोलधडाका कायम राखला; मात्र मुसियालाचा गोल लक्षवेधक ठरला. या नवोदिताने त्यानंतर काही वेळातच आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धांत इंग्लंड नव्हे, तर जर्मनीकडून खेळणार असल्याचे जाहीर केले. बायर्नने त्याच्याबरोबर पाच वर्षांच्या कराराचे संकेत दिले.

INDvsENG 'वेड्या'चे घर उन्हात; नरेंद्र मोदी स्टेडियमची 'अंदर की बात'

स्टुटगार्टमध्ये जन्मलेला मुसियाला हा चॅम्पियन्स लीगमध्ये गोल केलेला इंग्लंडचा सर्वांत लहान खेळाडू ठरला, पण काही महिन्यांपूर्वी इंग्लंडकडून 21 वर्षांखालील स्पर्धेत खेळलेल्या मुसालियाने आपण जर्मनीच्या वरिष्ठ संघास पसंती देणार असल्याचे सांगितले. बायर्न म्युनिच जगज्जेते आहेत. आम्ही चुका करून त्यांचा मार्ग सोपा केला असे म्हणू नका, असे लाझिओचे मार्गदर्शक सिमॉन इंझाघी यांनी सांगितले. त्यांनी परतीच्या लढतीत आम्हाला चमत्कार घडला तरच बाजी उलटवता येईल अशी कबुली दिली.

INDvsENG : नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'वोकल फॉर लोकल'चा सिक्सर!​

जर्मनी लीगमध्ये पीछेहाट मायदेशातच ठेवत बायर्नचा संघ रोमला आला होता. त्यांनी नवव्या मिनिटास पहिला गोल केला आणि त्यानंतर निकाल सांगण्यासाठी कोणा तज्ज्ञांची गरज नव्हती. विश्रांतीस 3-0 आघाडी घेतल्यावर बायर्नने फारशी आक्रमकता दाखवली नाही.

गिरॉडची बायसिकल किक निर्णायक

ऑलिव्हर गिरॉड याच्या बायसिकल किकमुळे चेल्सीने ॲटलेटिको माद्रिदचा 1-0 असा पराभव केला. गिरॉडचे हे प्रयत्न सुरुवातीस ऑफसाईड असल्याचे सांगून अवैध ठरवण्यात आले, पण व्हिडीओ रेफरींनी गोल वैध ठरवला. या गोलमुळे ॲटलेटिकोसमोर लंडनला किमान एक गोल करण्याचे आव्हान असेल. डोक्‍यावरून जाणाऱ्या चेंडूला किक करणे मला आवडते. तोच प्रयत्न मी केला होता, असे त्याने सांगितले. गिरॉडचा गोल सोडला तर ॲटलेटिकोचा बचाव त्यांच्या लौकिकास साजेसा होता. ॲटलेटिकोने चॅम्पियन्स लीगमध्ये घरच्या मैदानावर स्वीकारलेला गेल्या १४ लढतींतील हा केवळ तिसरा गोल आहे.

 
 


​ ​

संबंधित बातम्या