बुन्देसलिगा लीग : पहिल्याच सामन्यात बायर्न म्युनिखचा शाल्केवर मोठा विजय  

टीम ई-सकाळ
Saturday, 19 September 2020

बुन्देसलिगा फुटबॉल लीगच्या पहिल्या सामन्यात बायर्न म्युनिख संघाने शाल्केवर 8-0 ने विजय मिळवला आहे.

बुन्देसलिगा फुटबॉल लीगच्या पहिल्या सामन्यात बायर्न म्युनिख संघाने शाल्केवर 8-0 ने विजय मिळवला आहे. शाल्के संघाला मागील 17 सामन्यात विजय मिळवता आला नाही. तर बायर्न म्युनिख संघाची विजयी वाटचाल 22 सामन्यांची झालेली आहे. यापूर्वी बायर्न म्युनिख आणि शाल्के यांच्यातील सामन्यासाठी  7500 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने पुन्हा प्रेक्षकांसाठी परवानगी नाकारण्यात आली. 

नेमारने रोनाल्डो, मेस्सीला टाकलं मागे; एका वर्षासाठी 'पुमा'ने मोजले...

बायर्न म्युनिख आणि शाल्के यांच्यात झालेल्या सामन्यात सर्ज नाबरीने तीन गोल करत हॅटट्रिक केली. सर्ज नाबरीने खेळाच्या 4 थ्या, 47 व्या आणि 59 व्या मिनिटाला गोल केले. यानंतर लिओन गोरेंझका 19 व्या, रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीने 31 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर, थॉमस म्युलर 69 व्या, लॉरी सेन 71 व्या मिनिटाला आणि जमाल मुसियालने 81 व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केले. 

इटालियन ओपन स्पर्धेत राफेल नदालचे दमदार पुनरागमन 

दरम्यान, बायर्न म्युनिखने पहिल्याच सामन्यात विजयासह 3 अंक मिळवत बुन्देसलिगा लीगच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवले आहे. यानंतर हर्था दुसऱ्या, ऑग्सबर्ग तिसऱ्या, डार्टमंड चौथ्या आणि फ्रीबर्ग पाचव्या स्थानावर आहे.                  


​ ​

संबंधित बातम्या