ला लिगा : बार्सिलोनाची ला लिगा पीछेहाट कायम 

संजय घारपुरे
Sunday, 6 December 2020

सातव्या क्रमांकावर घसरण, आघाडीच्या संघापासून बारा गुणांनी दूर 

माद्रिद : लिओनेल मेस्सीच्या बार्सिलोना ला लिगा अर्थात स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये सलग चौथ्या पराभवास सामोरे जावे लागले. दरम्यान, याचवेळी रेयाल माद्रिदने या लीगमधील ऑक्‍टोबरनंतरचा पहिला विजय मिळवला. बार्सिलोना कादिझविरुद्ध 1-2 असे पराजित झाले. या पराभवामुळे ते सातव्या क्रमांकावरील गेले आहेत. आघाडीवर ऍटलेटिको माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यात आता 12 गुणांचा फरक आहे. ऍटलेटिकोने रेयाल व्हॅलादॉलिदचा 2-0 असा पाडाव केला. रेयाल माद्रिदला सेविलेचा 1-0 असा पराभव केल्याचे समाधान लाभले. 

चौथ्या दिवशीच विंडीजचा खेळ खल्लास; न्यूझीलंडनं हॅमिल्टनचं मैदान मारलं

या पराभवाने ला लिगा विजेतेपदाच्या स्पर्धेत आमची मोठी पीछेहाट झाली आहे, अशी खंत बार्सिलोनाचे मार्गदर्शक रोनाल्ड कोएमन यांनी व्यक्त केली. त्यांना सदोष बचावात्मक खेळाचा चांगलाच फटका बसला. स्वयंगोलमुळे रेयाल माद्रिद जिंकू शकले, पण त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. मात्र रेयालचे सध्याचे मार्गदर्शक झिनेदिन झिदान यांच्या पर्यायाचा विचार सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. 

युव्हेंटिसची पिछाडीनंतर सरशी 
 युव्हेंटिसने पिछाडीनंतर तोरिनोचा 2-1 असा पराभव केला. जर्मनीतील शेल्केकडून कर्जाऊ घेतलेल्या मध्यरक्षक वेस्टन मॅकेनी याने या सामन्यात युव्हेंटिसचा बरोबरीचा गोल केला. दहा सामन्यांतील पाचव्या विजयासह युव्हेंटिसचे 20 गुण झाले, तर इंटर मिलानने बोलोग्नोचा 3-1 असा पाडाव करीत 21 गुणांपर्यंत प्रगती केली. अद्यापही एसी मिलानने इंटरला दोन गुणांनी मागे टाकले आहे. युव्हेंटिसने बरोबरी साधल्यावर ख्रिस्तियानो रोनाल्डोने सहकारीच होणे पसंत केले. 

चेल्सी अव्वल स्थानावर 
चेल्सीने लीडस्‌चा 3-1 असा पराभव करून प्रीमियर लीगमध्ये अव्वल क्रमांक मिळवला. चाहत्यांच्या उपस्थितीत चेल्सीने पिछाडीनंतर विजय मिळवला. मॅंचेस्टर युनायटेडने अजूनही आपण शर्यतीत असल्याचे दाखवताना वेस्ट हॅमला 3-1 असे हरवले. युनायटेडने सलग तिसऱ्या अवे लढतीत विजय मिळवला. सलग नवव्या विजयासह ते आता चौथे आहेत. त्यांनी मॅंचेस्टर सिटीला एका गुणाने मागे टाकले आहे.

 

 


​ ​

संबंधित बातम्या