मॅराडोना यांना श्रद्धांजली देण्यासाठी जर्सी उतरविणाऱ्या लिओनेल मेस्सीवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्याच्या वेळेस जर्सी उतरविणाऱ्या लिओनेल मेस्सीला दंड ठोठावण्यात आला आहे.

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सामन्याच्या वेळेस जर्सी उतरविणाऱ्या लिओनेल मेस्सीला 600 युरोचा (53,738 रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. स्पेनच्या फुटबॉल फेडरेशनने स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये बार्सिलोना आणि ओसासुना यांच्यात झालेल्या सामन्यानंतर  लिओनेल मेस्सीवर ही कारवाई केली आहे. बार्सिलोना आणि ओसासुना यांच्यात झालेल्या सामन्यात बार्सिलोनाच्या संघाने ओसासुना 4-0 ने विजय मिळवलेला होता. 

चॅम्पियन्स लीग : रेयालवर साखळीत बाद होण्याचा धोका 

बार्सिलोना आणि ओसासुना यांच्यात झालेल्या सामन्यात बार्सिलोना संघाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने गोल केल्यानंतर बार्सिलोनाची जर्सी उतरविली आणि मॅराडोनाच्या जुन्या क्लब नेवेल्सची ओल्ड बॉईजची जर्सी घातली. व यानंतर त्याने आकाशात हात उंचावून दिवंगत फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांना श्रद्धांजली दिली होती. याशिवाय सामन्यानंतर लिओनेल मेस्सीने त्याच्या या सामन्यातील फोटो आणि दिएगो मॅराडोनाचा फोटो सोअल मीडियावर शेअर केला होता. आणि तसेच या फोटोसोबत त्याने 'फेअरवेल, डिएगो,' असे कॅप्शन दिले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Leo Messi (@leomessi)

दरम्यान, दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी 25 नोव्हेंबर 2020 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ब्यूनस आयर्सच्या हॉस्पिटलमध्ये दिएगो मॅराडोना यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याच्या दोन आठ्वड्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्याने दिएगो मॅराडोना यांचे निधन झाले.        

 

 


​ ​

संबंधित बातम्या