फुटबॉलच्या सरावास भारतातही सुरुवात 

संजय घारपुरे
Wednesday, 26 August 2020

कोरोना महामारीमुळे सर्वच सांघिक खेळांचा सराव बंद करण्यात आला आहे. मात्र मोहमेडन स्पोर्टिंगने सराव सुरू केला आहे. एकत्रित सराव सुरू करणारा मोहमेडन हा देशातील पहिला फुटबॉल क्‍लब ठरला आहे.

कोलकाता : कोरोना महामारीमुळे सर्वच सांघिक खेळांचा सराव बंद करण्यात आला आहे. मात्र मोहमेडन स्पोर्टिंगने सराव सुरू केला आहे. एकत्रित सराव सुरू करणारा मोहमेडन हा देशातील पहिला फुटबॉल क्‍लब ठरला आहे, असे क्‍लबने म्हटले आहे. 

रोहित शर्माने पत्नी रितिकासह सुरु केला वर्कआऊट  

सरावाच्या पहिल्या दिवशी क्‍लबच्या परंपरेनुसार नव्या खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. या शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर सर्व खेळाडूंचा जैवसुरक्षित वातावरणात कल्याणी येथील स्टेडियमवर सराव होणार आहे. खेळाडूंचे पूर्णपणे निवासी शिबिर असणार आहे. शिबिराबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे कसोशीने पालन होणार असल्याचे क्‍लबचे कार्यालयीन सचिव अकबर अली यांनी सांगितले. 

आता 'या' टेनिसपटूने घेतली यू.एस ओपनमधून माघार  

मोहमेडन यंदा आय लीगच्या द्वितीय श्रेणीत खेळणार आहेत. गतमोसमातील अपयशामुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. सराव सुरू करण्याबाबत मोहमेडन स्पोर्टिंग आणि भोवानिपोर क्‍लबच्या पदाधिकाऱ्यांनी पश्‍चिम बंगालचे क्रीडामंत्री अरूप बिश्‍वास यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांना कठोर नियमाचे पालन केल्यावरच सरावासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी क्‍लबने सरावात सहभागी होणारे खेळाडू, मार्गदर्शक तसेच सपोर्ट स्टाफ या एकंदर 34 जणांची कोरोना चाचणी घेतली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळेच त्यांचा सराव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


​ ​

संबंधित बातम्या