आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगडच्या पाच खेळाडूंची निवड

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 May 2019

मंडणगड - तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी मंडणगड तालुक्यातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. भारतीय संघातून मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे हर्ष नीलेश गोवळे, दुर्वेश नीलेश जाधव, तेजकुमार विश्‍वदास लोखंडे, अभिषेक अशोक मर्चंडे, विशाखा संजय करावडे हे खेळाडू खेळणार आहेत.

वर्ल्ड तायक्वॉंदो मान्यतेने तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे दुसरी खुली आंतरराष्ट्रीय तायक्वॉंदो चॅम्पियनशिप वर्ल्ड तायक्वॉंदो जी-1 रॅकिंग स्पर्धेचे आयोजन हैद्राबाद येथील कोटला विजयभास्कर रेड्डी इनडोअर क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. स्पर्धेत तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अडॉक कमिटी व रत्नागिरी जिल्हा तायक्वॉंदो स्पोर्टस असो. मान्यतेने मंडणगडच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष गोवळे 57 किलो, दुर्वेश जाधव 48 किलो वजनी गटात, तेजकुमार लोखंडे 54 किलो वजनी गटात, अभिषेक मर्चंडे 63 किलो वजनी गटात, तसेच विशाखा करावडे 62 किलो वजनी गटात खेळणार आहेत. या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अनेक पदके प्राप्त केली आहेत.

या स्पर्धेसाठी जिल्हा असोसिएशनकडून प्रशिक्षक म्हणून भरत कर्रा यांची निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्टस्‌ असोसिएशनचे अध्यक्ष व्यकंटेशराव कर्रा, उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, कोषाध्यक्ष शशांक घडशी, मंडणगड तालुका तायक्वॉंदो ऍकॅडमीचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, तायक्वॉंदो सेंटर क्‍लब अध्यक्ष आदेश मर्चंडे, रवींद्रकुमार मिश्रा, दीपिका घोसाळकर, चंद्रकांत रेवाळे, जयराम कोटेरा, रुपेश कांबळे, सुप्रेश आंबेकर, सेजल गोवळे, सूर्यकांत बैकर, सुधीर महाडीक, भास्कर जायभाये, मानसी पालांडे आदी संस्थेचे पदाधिकारी जादा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

​ ​

संबंधित बातम्या