युवराज सिंह विरोधात पोलिसात तक्रार दाखल; जातीवाचक शब्द वापरल्याचा आहे आरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

दलित अधिकार कार्यकर्ता आणि वकिल रजत कळसन यांनी युवी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

भारतीय संघाचा माजी ऑलरांउडर युवराज सिंह याला भारतीय संघातील युवा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्या टिकटॉक व्हिडीओवर कमेंट करणे महागात पडले आहे. व्हिडीओ वर कमेंट करत असताना युवराजने जातीवाचक शब्द उच्चारला त्यानंतर सोशल मिडीयावर नेटकऱ्यांकडून जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर हरियाणातील हिसार जिल्ह्यातील दलित अधिकार कार्यकर्ता आणि वकिल रजत कळसन यांनी युवी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

काही दिवसांपुर्वी सोशल मिडीयावर युवराज सिंह याचा एक जुना व्हिडीओ ट्रेंड करत होता. त्यानंतर ट्विटरवरती #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग ट्रेंड करायला लागला. या व्हिडीओमध्ये युवराज हा फलंदाज रोहित शर्मा याच्यासोबत इंस्टाग्राम लाईव्ह मध्ये गप्पा मारत होता. चर्चेदरम्यान चहलचा विषय आल्यानंतर त्याने जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. 

"शेन वॉर्नने सत्तावीस वर्षांपुर्वी आजच फेकला होता ‘बॉल ऑफ द सेंच्यूरी’..पाहा व्हिडीओ"

लॉकडाऊनच्या सुरुवातीला सर्व क्रिकेटपटू सोशल मिडीयावर जास्तच एक्टीव झाले आहेत, सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतर खेळाडूंसोबत लाईव्ह मध्ये गप्पा मारताना दिसत आहेत. फिरकीपटू युजवेंद्र चहल हा देखील टिकटॉकव  त्याच्या संपुर्ण परिवारासोबत मिळून मजेशीर व्हिडीओ बनवून शेअर करत होता. तशाच एका व्हिडीओवर युवराजने जातीवाचक शब्द वापरत कमेंट केली आहे.

"दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होता हा क्रिकेटपटू; बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्येचा केला होता विचार!"

या सर्व प्रकारावर रजत कळसन यांनी युवराज विरोधात एफआय़आर दाखल केली आहे त्यासोबत त्यांनी युवराजसोबतच रोहित शर्मा याला देखील सह आरोपी बनवले आहे. युवराजने जेव्हा जातीवाचक शब्द वापरले तेव्हा रोहित त्यावर हसत होता त्यामुळे तो देखील आडचणीत सापडला आहे. रजत यांनी युवराजला अटक करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सध्या प्रकारणाच तपास केला जात आहे, मात्र दोषी अढळल्यास मात्र युवराजच्य अडचणी वाढण्याचा शक्यता आहे. 

 


​ ​

संबंधित बातम्या