तीनशे मिनिटांनंतर अखेर रोनाल्डोचा युव्हेंट्‌ससाठी गोल

वृत्तसंस्था
Tuesday, 18 September 2018

मिलान : सर्वाधिक चर्चा होऊन रेयाल माद्रिदकडून युव्हेंट्‌स संघात दाखल झालेल्या सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोला अखेर तीनशे मिनिटांहून अधिक काळ खेळल्यानंतर युव्हेंट्‌ससाठी पहिला गोल करता आला. त्यानंतर आणखी एक गोल केला आणि इटालीयन लीग फुटबॉल स्पर्धेत युव्हेंट्‌सने सासुओलो संघाचा 2-1 असा पराभव केला. या दोन गोलांसह रोनाल्डोने लीग फुटबॉलध्ये 400 गोलांचाही पराक्रम केला, अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज ठरला आहे. 

रेयाल माद्रिदला बाय बाय केले तेव्हा रोनाल्डोच्या खात्यात 398 लीग गोल होते. पुढील दोन गोल करण्यासाठी त्याला तीन सामने वाट पाहावी लागली. नव्या क्‍लबकडून खेळताना त्याला एकही गोल करता आला नव्हता. युव्हेंट्‌सच्या जर्सीत खेळताना केलेला पहिला गोल त्याच्या क्षमतेच्या तुलनेत सोपा होता. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूने केलेल्या चुकीचा फायदा घेत रोनाल्डोने हा गोल केला. तसेच दुसऱ्या गोलासाठीही त्याला फार मेहनत घ्यावी लागली नाही. 

मी घरच्या मैदानावर खेळतोय असे मला जाणवत आहे, ही स्पर्धा मला अधिक जवळची आहे. 
- ख्रिस्तियानो रोनाल्डो 

 रोनाल्डोच्या 400 लीग गोलांची आकडेवारी 
- स्पोर्टिंग लिसबनकडून 3, मॅंचेस्टर युनायटेडकडून 84, रेयाल माद्रिदकडून 311     आणि युव्हेंट्‌स 2. 
- 400 लीग गोल करणारा पाचवा फुटबॉलपटू. 
- सर्वाधिक लीग गोल जोसेफ बिकॅन (518) 
- फेरेन्स पुस्कास (514) 
- जिमी मॅक्‌ग्रोरी (410) 
- उवे सीलर (406). 

​ ​

संबंधित बातम्या