रिक्षा चालवून लेकाला दर्जेदार क्रिकेटर बनवणारा 'बाप'माणूस

सकाळ स्पोर्टस् ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

आयपीएलच्या लिलावात हैदराबादने त्याच्यावर 2.6 कोटी रुपयांची बोली लावली होती.  आयपीएलमधील लक्षेवधी खेळीनंतर  2017 मध्ये  त्याला भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले. एका वनडेतीही त्याला संधी मिळाली. यात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावे 3 विकेट्स आहेत.  

आयपीएलच्या इतिहासात दोन निर्धाव षटके टाकून चर्चेत आलेल्या रॉयल चॅलेंजर्सच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज युएईतून थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. हैदराबादच्या या क्रिकेटरच्या आतापर्यंतच्या यशात त्याच्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. सिराजचे वडील मोहम्मद गौस  रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करायचे. मोहम्मद गौस रिक्षा चालवत असले तरी त्यांनी आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे स्वप्न पाहिले. त्याला कोणत्याही गोष्टीची उणीव भासणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली.  

वडिलांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सिराजने आहोरात्र मेहनत घेतली.  रात्रीचा दिवस करुन त्याने मेहनत घेतली. सातवीच्या वर्गात शिकत असल्यापासून त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. जिद्द आणि मेहनतीनं त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केले. देशांतार्गत क्रिकेटमध्ये आपल्यातील क्षमता दाखवून दिल्यानंतर 2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले.

आयपीएलच्या लिलावात हैदराबादने त्याच्यावर 2.6 कोटी रुपयांची बोली लावली होती.  आयपीएलमधील लक्षेवधी खेळीनंतर  2017 मध्ये  त्याला भारतीय टी-20 संघात स्थान मिळाले. एका वनडेतीही त्याला संधी मिळाली. यात आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्या नावे 3 विकेट्स आहेत.  

आयपीएल 2020 च्या 39 व्या सामन्यात आरसीबीच्या संघाने केकेआरला (KKR vs RCB)8 विकेट राखून पराभूत केले. बंगळुरु संघाच्या विजयात जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) ने मोलाची कामगिरी बजावली. त्याने 4 षटकांच्या कोट्यात 8 धावा करुन सिराजनं 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे लो स्कोअरिंग सामन्यात त्याने सलग दोन ओव्हर मेडन टाकल्या. आयपीएलच्या इतिहासात लागोपाठ दोन मेडन टाकण्याचा अनोखा विक्रम सिराजने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात केला. त्याच्या गोलंदाजीत स्विंगचा अप्रतिम नजराणा पाहायला मिळाला.       


​ ​

संबंधित बातम्या